Maharashtra Corona Update: राज्यात आज कोरोनामुळे 134 जणांचा मृत्यू; तर 5,787 नवीन रुग्णांची नोंद
राज्यात आज 134 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे.
![Maharashtra Corona Update: राज्यात आज कोरोनामुळे 134 जणांचा मृत्यू; तर 5,787 नवीन रुग्णांची नोंद maharashtra corona cases patients 5352 discharged today 5787 new cases in the state today Maharashtra Corona Update: राज्यात आज कोरोनामुळे 134 जणांचा मृत्यू; तर 5,787 नवीन रुग्णांची नोंद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/16/03c2ba6a661a03f31ac4f6e05b51668d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. आज 5,787 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 352 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 86 हजार 223 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.84 टक्के आहे.
राज्यात आज 134 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 07,59, 767 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,87, 863 (13.58 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,73,812 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2, 512व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 262 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 262 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 323 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,17,775 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 2,879 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1860 दिवसांवर गेला आहे.
पुण्यात गेल्या 24 तासात 258 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
पुण्यात गेल्या 24 तासात 258कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 249 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 4,79,257 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर पुण्यात गेल्या 24 तासात 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 2,128 सक्रिय रुग्ण आहेत.
देशात गेल्या 24 तासात 40 हजारांच्या जवळपास कोरोना रुग्ण
शनिवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मागील 24 तासात देशात 38,667 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर 478 जणांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे. कालच्या तुलनेत आज कमी केसेस समोर आल्या आहेत. काल 40,120 रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात देशात 35,743 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना महामारीच्या सुरुवातीनंतर आतापर्यंत देशात तीन कोटी 21 लाख 56 हजार जण कोरोनाबाधित झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)