Maharashtra Corona Cases: मोठा दिलासा! राज्यात सोमवारी 61,607 रुग्ण बरे होऊन घरी, तर नवीन 37,326 रुग्णांचे निदान
Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लावलेल्या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम झालेला मागील काही दिवसांच्या रुग्णांच्या आकडेवारीवरुन समोर आलं आहे. आज राज्यात 61,607 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज नवीन 37,326 रुग्णांचे निदान झाले आहे.
Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लावलेल्या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम झालेला मागील काही दिवसांच्या रुग्णांच्या आकडेवारीवरुन समोर आलं आहे. आज राज्यात 61,607 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज नवीन 37,326 रुग्णांचे निदान झाले आहे. जवळपास महिन्याभरानंतर कोरोना रुग्णांचा एका दिवसातला आकडा 40 हजारांच्या खाली आला आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 44,69,425 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरेहोण्याचेप्रमाण (Recovery Rate) 86.97 टक्के झाले आहे. आज राज्यात 37,326 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर आज 549 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.49 टक्के एवढा आहे.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 29631127 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 5138973 (17.34 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3670320 क्वारंटाईनमध्ये आहेत तर 26664 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 590818 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आज मुंबईत 1,794 रुग्णांचे निदान झाले तर 3,580 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुण्यात 1165 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत तर एकाच दिवशी 4010 जण बरे होऊन घरी गेले आहेत.
नागपूर जिल्ह्यात आज 2530 कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. (नागपूर शहर 1371, नागपूर ग्रामीण 1149). जिल्ह्यात आज कोरोनामुळे 51 मृत्यू झाले. तर आज 6,068 कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात काल रविवारी 48,401 नवीन रुग्णांचे निदान झाले होते तर राज्यभरात 60,226 रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. तर परवा म्हणजे शनिवारी 82,266 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला होता तर 53,605 नवीन रुग्णांचे निदान झाले होते.