Maharashtra Corona Cases : राज्यात शनिवारी 10,697 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 14,910 डिस्चार्ज, सध्या 1,55,474 ॲक्टिव्ह रुग्ण
Maharashtra Corona Cases : राज्यात आज तर 10,697 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 14,910 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 360 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
Maharashtra Corona Cases : राज्यात आज तर 10,697 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 14,910 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 360 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे, काल ही संख्या कमी नोंदवण्यात आली होती. राज्यात आज एकूण 1,55,474 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आजपर्यंत एकूण 56,31,767 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.48% टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 360 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.84 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,78,34,054 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58,98,550 (15.59 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9,63,227 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 5,807 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 733 कोरोनाबाधितांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 733 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 732 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
पुणे शहरात आज नव्याने 331 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
पुणे शहरात आज नव्याने 331 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 73 हजार 870 इतकी झाली आहे. शहरातील 459 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 62 हजार 222 झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 3 हजार 182 रुग्णांपैकी 517 रुग्ण गंभीर तर 862 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.पुणे महापालिका हद्दीत नव्याने 10 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 466 इतकी झाली आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अजूनही चिंताजनक
राज्यातील कोरोना संसर्गाचा दर काही प्रमाणात घटत असला तरी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे आणि कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनासह राज्य सरकारला या जिल्ह्यात अधिक लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे.कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने राज्य अनलॉकच्या दिशेने वाटचाल करत आहे. मात्र राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये अजूनही परिस्थिती चिंताजनक आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात रुग्ण संख्या कमी झाली असली तरी परिस्थिती चिंताजनक म्हणावी लागेल. त्यामुळे येत्या सोमवारपासून (14 जून) अनेक जिल्ह्यांचा स्तर बदलणार आहे आणि त्यानुसार निर्बंध लागू केले जाणार आहेत. मात्र राज्य सरकारला पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्हे आणि कोकण विभागातील या तीन जिल्ह्याकडे विशेष लक्ष द्यावा लागणार आहे.