एक्स्प्लोर
Advertisement
शिवसेना सत्तेसाठी लाचार, अशोक चव्हाणांची टीका, अभद्र युतींबाबतही पुनर्विचार
लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अभद्र युती आहे, अशा सर्व युती तोडण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असं अशोक चव्हाण म्हणाले.
सोलापूर : शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. वारंवार अपमान झाल्यानंतरही शिवसेना युतीची औपचारिकता पूर्ण करत आहे, त्यातून सेनेची लाचारी दिसत असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.
एखादा पक्ष सत्तेसाठी किती लाचारी पत्करु शकतो, हे शिवसेनेने दाखवून दिलं आहे, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली. सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दरम्यान, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अभद्र युती आहे, अशा सर्व युती तोडण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असंही चव्हाण म्हणाले.
राज्यात आणि केंद्रात महाआघाडीची सकारात्मक चर्चा सुरु आहे. येत्या आठवड्याभरात महाआघाडीची घोषणा होण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र मनसेला महाआघाडीत घेण्यासंदर्भात अजूनही सकारात्मक विचार झालेला नाही, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.
20 फेब्रुवारीला महाआघाडीची पहिली सभा होणार आहे, तर एक मार्चला राहुल गांधींची सभा धुळ्यात होणार असल्याचं अशोक चव्हाणांनी सांगितलं.
सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्यास कोणतीही अडचण नाही. ते पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत, असं चव्हाण म्हणाले.
ज्या मंत्र्यांवर आरोप आहेत, त्यांना मुख्यमंत्र्यांचं अभय आहे, असं म्हणत अशोक चव्हाणांनी नाव न घेता सुभाष देशमुखांवर टीका केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement