CM Eknath Shinde : विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक, मुलांच्या मृत्यूच्या आठवणीने अश्रू अनावर
CM Eknath Shinde : विधानसभेत विश्वासमत दर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर बोलताना मुख्यंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मरण पावलेल्या मुलांच्या आठवणीने भावूक झाले.

मुंबई : अपघातात मरण पावलेल्या दोन्ही मुलांचा उल्लेख करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज विधानसभेत भावूक झाले. "माझी दोन मुले मरण पावली त्यावेळी आनंद दिघे यांनी मला समजावले. तेव्हा वाटायचं कुणासाठी जगायचं, कुटुंबासोबत राहीन. आज बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने सरकार स्थापन केले आहे, असे सांगताना एकनाथ शिंदे यांना रडू कोसळले.
विधानसभेत विश्वासमत दर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर बोलताना मुख्यंत्री शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी काही जुण्या आठवणी सांगतल्या. यावेळी त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांच्या अपघाती मृत्यूची आठवण काढली. यावेळी ते खूपच भावूक झाले. यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले.
"संपूर्ण आयुष्य शिवसेनेसाठी काम केलं. सतत समाज कार्यात असल्यामुळे कुटुंबाला वेळ देता आला नाही. परंतु, मुलांचा मृत्यू झाला त्यावेळी सर्व काही संपलं असं वाटत होतं. माझी दोन मुलं माझ्या डोळ्यासोरून गेली. माझं कुटुंब उधवस्त झालं होतं. त्यावेळी सर्व सोडून कुटुंबासाठी वेळ द्यायचा असं ठरवलं होतं. यापुढे फक्त माझा मुलगा, माझी पत्नी आणि आई-वडिलांसाठी गजायचं असं ठरवलं होतं. त्यावेळी मी कोलमडून पडलो होतो. परंतु, माझ्या लक्षात आलं की कुटंबाला माझी आवश्यकता आहे. त्याचवेळी आनंद दिघे यांनी मला आधार देत पुन्हा राजकारणात आणलं. त्यांच्याच आशीर्वादाने आज मी मुख्यमंत्री झालो आहे, अशा भावाना यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.
"माझ्या दोन मुलांचा मृत्यू झाला त्यावेळी आनंद दिघे यांनी मला समजावले. त्यावेळी विचार करायचो कोणासाठी जगायचं? कुटुंबासोबत राहीन, परंतु, आनंद दिघे पाच वेळा घरी आले. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, आता काम करू शकत नाही. परंतु, आनंद दिघे म्हणाले, तू डोळे पुसून दुसऱ्यांचे अश्रू पुसायचे आहे. त्यावेळीपासून आनंद दिघे यांनी माझी काळजी घेतली, अशी आठवण यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितली.























