Maharashtra Breaking News Live Updates: महायुती सरकारच्या शपथविधीचा घोळ कायम, मुंबईत घडामोडींना वेग, एकनाथ शिंदेच्या भूमिकेकडे लक्ष
Maharashtra Election Results News Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
LIVE
Background
मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव कायम असलं तरी महायुती सरकारच्या शपथविधीचा घोळ अद्यापही कायमच आहे, महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेला चांगलाच वेग आला आहे. सध्या एकनाथ शिंदेच्या भूमिकेकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलंय. राज्यात आज नेमक्या काय घडामोडी घडणार? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, तर दुसरीकडे राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना हुडहुडी भरली आहे. गाव-खेड्यात शेकोट्या पेटत आहेत. आगामी काळात तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सर्वच घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
Amravati Accident : दर्यापूर-अकोला मार्गावर भीषण अपघात तिघांचा मृत्यू, तीन गंभीर
आज दुपारी 3 वाजता दर्यापूर अकोला मार्गावर लासुर फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनात जोरदार धडक झाली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. एका वाहनात चार जण होते तर दुसऱ्या वाहनात दोन जण प्रवास करत होते. जखमींना अकोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Maharashtra Politics : भाजपचे निरीक्षक उद्या रात्रीपर्यंत मुंबईत दाखल होणार
महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे निरीक्षक उद्या रात्रीपर्यंत मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 4 डिसेंबर रोजी सकाळी भाजपच्या विधीमंडळ गटनेते पदाची बैठक पार पडणार असल्याचेही समजते.
Ballot Paper : मारकडवाडीत बॅलेटवर मतदान घेण्याच्या तयारीत असलेल्या पदाधिकाऱ्यांना नोटीस
उद्या मारकडवाडी येथे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या तयारीत असलेल्या प्रमुख 20 पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण बनण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासनाच्या दबावानंतर ग्रामस्थ काय भूमिका घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर नेत्यांची लगबग, सागर बंगल्यावर घडामोडींना वेग
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर नेत्यांची लगबग सुरु असल्याचे दिसून येत आहे. मंत्रीपदासंदर्भात चर्चेत असणारी नावं सागर बंगल्यावर दाखल होत असल्याने घडामोडींना वेग आला आहे. माधुरी मिसाळ, चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर, गिरीश महाजन यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
Akkalkot Dogs death: अक्कलकोट मध्ये मोकाट फिरणाऱ्या श्र्वानांवर विषप्रयोग?
गेल्या दोन दिवसात दहा ते बारा श्वान विष प्रयोगामुळे मृत्युमुखी पडल्याची घटना. या प्रकारणी अद्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल. प्राणी मित्रांकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी करण्याची मागणी. गेल्या काही दिवसात नागरिकांना श्वान चावण्याचे प्रमाण वाढल्याने हा विष प्रयोग होत असल्याची चर्चा. या घटनेचा प्राणी मित्रांकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे