एक्स्प्लोर
राजधानी दिल्लीत महाराष्ट्राचा डंका, चित्ररथाला पहिलं पारितोषिक
संरक्षणमंत्री निर्मला सितारमन यांच्या हस्ते महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचं पहिलं पारितोषिक देण्यात आलं.
नवी दिल्ली : यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला आहे. संरक्षणमंत्री निर्मला सितारमन यांच्या हस्ते महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचं पहिलं पारितोषिक देण्यात आलं.
प्रजासत्ताक दिनी राजपथावर विविध राज्यांचे तसेच दूरदर्शन, सैन्यदलासह विविध खात्यांचे चित्ररथ साकारण्यात आले होते. महाराष्ट्राने यावर्षी शिवराज्याभिषेकाचा चित्ररथ साकारला होता. तर आसामने स्थानिक लोककलांवर आधारित चित्ररथ साकारला होता. छत्तीसगडच्या चित्ररथानेही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
दरम्यान, यापूर्वीही 2015 साली महाराष्ट्राच्या चित्ररथाने पहिलं पारितोषिक मिळवलं होतं. महाराष्ट्राचं वैभव देशालाच नव्हे तर जगाला सांगणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळा या चित्ररथाचा पहिलं पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
‘तेज तम अंस पर । कान्ह जिमि कंस पर। त्यों मलिच्छ बंस पर । सेर सिवराज है । या कविराज भूषण यांच्या वीररसाने भरलेल्या काव्याचा उद्घोष करत शिवरायांची किर्ती सांगणारा महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर दाखल झाला होता.
कवी भूषण यांचं ‘तेज तम अंस पर । कान्ह जिमि कंस पर। त्यों मलिच्छ बंस पर । सेर सिवराज है । हे काव्य अजय-अतुलने संगीतबद्ध केलेलं आहे. ज्या दिल्लीने छत्रपतींच्या स्वराज्याला कायम कमी लेखलं, ज्या दिल्लीश्वरांशी झगडण्यात शिवरायांचं आयुष्य खर्ची पडलं, त्याच दिल्लीच्या मातीत अनेक राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत छत्रपतींच्या पराक्रमाची कीर्ती सांगणारा हा चित्ररथ दिमाखात अवतरला.
यावेळी राजपथावर 14 राज्यांसह केंद्र सरकारच्या 7 खात्यांचे आणि भारत-आशियान राष्ट्रांचे संबंध दाखवणारे 2 चित्ररथ असे एकूण 23 चित्ररथ होते.
महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या सुरुवातीला किल्ल्याची प्रतिकृती असून त्यावर मधोमध शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दर्शवण्यात आलेली होती. तर मध्यभागी रायगडाची प्रतिकृती आणि त्या ठिकाणच्या मेघडंबरीत सिंहासनावर छत्रपती शिवराय विराजमान झालेले दाखवण्यात आले होते.
या ठिकाणी आभूषण देणारा दरबारी, त्याच्या शेजारी गागाभट्ट, तर या राज्याभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी सर हेन्री ऑक्सिजन दाखवण्यात आले.
दरबारात छत्रपती शिवरायांच्या शेजारी बसलेल्या सोयराबाई आणि संभाजीराजे दाखवण्यात आले. चित्ररथाच्या मागच्या भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ दर्शवण्यात आल्या. या चित्ररथाची संकल्पना ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी सादर केली होती.
संबंधित बातम्या :
जगाने पाहिली देशाची ताकद, राजपथावर भक्ती, शक्ती आणि संस्कृती
महाराष्ट्राचा चित्ररथ येताच संभाजीराजेंची उभं राहून घोषणाबाजी
स्वतंत्र भारतातील प्रजासत्ताक दिनाची पहिली परेड कुठे झाली माहितीय का?
प्रजासत्ताक दिन 2018 : राजपथावर चित्ररथांतून भारतीय संस्कृतीचं अनोखं दर्शन
प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचं वैभव देशाला दाखवणारा चित्ररथ कसा असेल?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement