एक्स्प्लोर

चंद्रपुरातील दारुबंदी का उठवली? सरकार म्हणतंय, गुन्हेगारी रोखण्यासाठी निर्णय तर विरोधकांची निर्णयावर टीका 

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.दारुबंदीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात असामाजिक प्रवृत्ती व गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याचं सरकारनं म्हटलंय तर विरोधी पक्षानं या निर्णयावर टीका केली आहे.

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. 1 एप्रिल, 2015 पासून दारुबंदी लागू केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात वाढलेले अवैध दारुचे प्रमाण, वाढलेली गुन्हेगारी याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला, असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.  शासनाने 1 एप्रिल 2015 पासून संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात दारु विक्रीचे आणि दारू पिण्याचे परवाने रद्द करून संपूर्ण जिल्ह्यत दारूबंदी लागू केली होती. या दारूबंदीच्या अनुषंगाने जुलै, 2018 मध्ये विधानसभेमध्ये झालेल्या चर्चेच्या वेळी तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांनी समिती नेमण्याबाबत आश्वासन दिले होते.  त्यानुषंगाने सेवानिवृत्त माजी प्रधान सचिव रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून तिचा अहवाल 9 मार्च 2021 रोजी शासनास सादर करण्यात आला.  

दारूबंदी उठविण्यामागील प्रमुख कारणे

झा समितीने काढलेल्या निष्कर्षाप्रमाणे दारूबंदीची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर अपयशी ठरली असून, जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू आणि बनावट दारू काळ्या बाजारात उपलब्ध होत आहे.  ही दारू अतिशय घातक आहे.  यातून दारूचा काळाबाजार देखील वाढला आहे.  शासनाचे वैध दारू विक्रीमधून मिळणाऱ्या महसूलाचे मोठे नुकसान झाले आहे व गुन्हेगारी क्षेत्रातील खासगी व्यक्तींचा प्रचंड आर्थिक फायदा झाला आहे. बेकायदेशीर दारू व्यापारात स्त्रिया आणि मुले यांच्या वाढत्या सहभागामुळे चिंता निर्माण करण्यासारखी परिस्थिती झाली आहे.  तसेच, दारुबंदीच्या बाबतीत बहुसंख्य संघटना, नागरिक व रहिवाशांनी दारुबंदी मागे घेण्याच्या बाजुने कौल दिला आहे.  या कारणांमुळे झा समितीने दारुबंदी उठविण्याबाबत निष्कर्ष काढला आहे.  

चंद्रपुरातील दारुबंदी हटवली, राजकारण, आंदोलनं, पत्रं, समित्या अन् बरंच काही... जाणून घ्या आतापर्यंत काय-काय घडलं

दारुबंदीमुळे गुन्हेगारीत वाढ
दारुबंदीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात असामाजिक प्रवृत्ती व गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली.  दारूबंदीपूर्वी म्हणजे 2010-2014 या काळात 16 हजार 132 गुन्हे दाखल झाले होते.  दारूबंदीनंतर म्हणजे 2015-2019 या काळात 40 हजार 381 गुन्हे दाखल करण्यात आले.  दारूबंदीपूर्वी 1729 महिला गुन्हेगारीची प्रकरणे होती.  दारूबंदीमध्ये 4042 महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर बालकांचा अवैध दारूसाठी वापर करण्याची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली.  

दारूबंदीमुळे महसुलात तूट
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीमुळे गेल्या 5 वर्षात 1606 कोटी रुपये इतके राज्य उत्पादन शुल्कात नुकसान झाले.  तर 964 कोटी रुपये विक्रीकर बुडाला असे एकंदर 2570 कोटी रूपयांचा महसूल शासनास मिळू शकला नाही.  

नागरिकांची मोठ्या प्रमाणावर निवेदने

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी विषयी ग्रामपंचायत, शिक्षक, महिला संघटना, धार्मिक संघटना, कामगार, सामाजिक संघटना, वकील, पत्रकार व सर्वसामान्य नागरिक यांनी 2 लाख 69 हजार 824 निवेदने जिल्हाधिकाऱ्यांच्या समिक्षा समितीकडे पाठविली.  यातील बहुसंख्य म्हणजे 2 लाख 43 हजार 627 निवेदने दारूबंदी उठविण्यासंदर्भात असून, 25 हजार 876 निवेदने दारूबंदी कायम राहण्याबाबत आहेत.  

मोठी बातमी! चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवली, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय 

चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस

चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचे दूरमागी परिणामी होतील, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज या संदर्भातील निर्णय घेतला. कोरोना काळात राज्यातील आरोग्याच्या स्थितीवर लक्ष देणे सोडून महाविकास आघाडी सरकारच्या प्राथमिकता काय आहेत, हेच या निर्णयातून दिसून येते. त्यामुळेच हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चेंबूरमधील अग्नितांडवानंतर मेलेल्याच्या टाळुवरचं लोणी खाणाऱ्यांनी गुप्ता कुटुंबीयांच्या कपाटातून 10 तोळे सोनं पळवलं
चेंबूरमधील अग्नितांडवानंतर मेलेल्याच्या टाळुवरचं लोणी खाणाऱ्यांनी गुप्ता कुटुंबीयांच्या कपाटातून 10 तोळे सोनं पळवलं
MP Vishal Patil Vs Sanjay Patil : बस खाली! तासगावमध्ये खासदार विशाल पाटील अन् माजी खासदार संजय पाटलांची थेट व्यासपीठावर खडाजंगी
ए बस खाली! तासगावमध्ये खासदार विशाल पाटील अन् माजी खासदार संजय पाटलांची थेट व्यासपीठावर खडाजंगी
फलटणमध्ये 14 तारखेला कार्यक्रम, शरद पवारांची घोषणा, रामराजेंनी निर्णय घेतल्यास साताऱ्यात चार मतदारसंघाचं गणित बदलणार, कारण...
फलटणमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम, शरद पवारांची घोषणा, रामराजेंनी निर्णय घेतल्यास साताऱ्याचं राजकारण बदलणार
जावई कुणाचाय, तुम्ही विधानसभेत पाठवा, मी..; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांना मंत्रीपदाचे संकेत
जावई कुणाचाय, तुम्ही विधानसभेत पाठवा, मी..; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांना मंत्रीपदाचे संकेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhangar Reservation : धनगर आरक्षणातला अडथळा दूर, धनगड जातीचे दाखले रद्द, गोपीचंद पडळकरांची माहितीHarshvardhan Patil : सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यात अदृश्य सहभाग, हर्षवर्धन पाटलांचा गौप्यस्फोटCity 60 News : Superfast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा एक क्लिकवर : 07 OCT 2024100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चेंबूरमधील अग्नितांडवानंतर मेलेल्याच्या टाळुवरचं लोणी खाणाऱ्यांनी गुप्ता कुटुंबीयांच्या कपाटातून 10 तोळे सोनं पळवलं
चेंबूरमधील अग्नितांडवानंतर मेलेल्याच्या टाळुवरचं लोणी खाणाऱ्यांनी गुप्ता कुटुंबीयांच्या कपाटातून 10 तोळे सोनं पळवलं
MP Vishal Patil Vs Sanjay Patil : बस खाली! तासगावमध्ये खासदार विशाल पाटील अन् माजी खासदार संजय पाटलांची थेट व्यासपीठावर खडाजंगी
ए बस खाली! तासगावमध्ये खासदार विशाल पाटील अन् माजी खासदार संजय पाटलांची थेट व्यासपीठावर खडाजंगी
फलटणमध्ये 14 तारखेला कार्यक्रम, शरद पवारांची घोषणा, रामराजेंनी निर्णय घेतल्यास साताऱ्यात चार मतदारसंघाचं गणित बदलणार, कारण...
फलटणमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम, शरद पवारांची घोषणा, रामराजेंनी निर्णय घेतल्यास साताऱ्याचं राजकारण बदलणार
जावई कुणाचाय, तुम्ही विधानसभेत पाठवा, मी..; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांना मंत्रीपदाचे संकेत
जावई कुणाचाय, तुम्ही विधानसभेत पाठवा, मी..; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांना मंत्रीपदाचे संकेत
Accident : बसच्या भीषण अपघातात 6 ठार, 35 जखमी; ड्रायव्हर रील करत होता, सांगूनही थांबला नाही, आता फरार झाला
बसच्या भीषण अपघातात 6 ठार, 35 जखमी; ड्रायव्हर रील करत होता, सांगूनही थांबला नाही, आता फरार झाला
Maharashtra Vidhansabha Election 2024: विधानसभेची खडाजंगी: अलिबाग विधानसभा मतदारसंघात काँग्रेस अन् शेकापमध्ये रस्सीखेच; महायुती की महाविकास आघाडी, यंदा कोण मारणार बाजी?
अलिबाग विधानसभा मतदारसंघात काँग्रेस अन् शेकापमध्ये रस्सीखेच; महायुती की महाविकास आघाडी, यंदा कोण मारणार बाजी?
तुतारी हाती घेताच हर्षवर्धन पाटलांना शरद पवार गटाकडून मोठं गिफ्ट; जयंत पाटील म्हणाले, इंदापूरचं शिवधनुष्य...
तुतारी हाती घेताच हर्षवर्धन पाटलांना शरद पवार गटाकडून मोठं गिफ्ट; जयंत पाटील म्हणाले, इंदापूरचं शिवधनुष्य...
इंदापूरला निघण्यापूर्वीच फोन, शरद पवारांनी सांगितला किस्सा; रामराजेही अजित पवारांना देणार धक्का?
इंदापूरला निघण्यापूर्वीच फोन, शरद पवारांनी सांगितला किस्सा; रामराजेही अजित पवारांना देणार धक्का?
Embed widget