राममंदिर आणि शिवजयंतीनिमित्त आनंदाचा शिधा मोफत, सत्यशोधक सिनेमा करमुक्त; मंत्रिमंडळ बैठकीतील नऊ धडाकेबाज निर्णय
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सत्यशोधक हा मराठी सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्याशिवाय राममंदिर आणि शिवजयंतीनिमित्त आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
![राममंदिर आणि शिवजयंतीनिमित्त आनंदाचा शिधा मोफत, सत्यशोधक सिनेमा करमुक्त; मंत्रिमंडळ बैठकीतील नऊ धडाकेबाज निर्णय Maharashtra Cabinet Meeting Ram mandir pran pratishtha and Shiv Jayanti free Anandacha Shidha Marathi News Cabinet Decision राममंदिर आणि शिवजयंतीनिमित्त आनंदाचा शिधा मोफत, सत्यशोधक सिनेमा करमुक्त; मंत्रिमंडळ बैठकीतील नऊ धडाकेबाज निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/16/8193a5dc9644657c947056f14ec8ba2d1694834232185737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अयोध्येत (Ayodhya) श्रीरामांच्या मूर्तीची (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे. या सोहळ्याच्या दिवशी देशात दिवाळी साजरे करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीप्रमाणेच राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ (Anandacha Shidha) देण्याचा निर्णय शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार या शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या (Maharashtra Cabinet Decision) बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
शिवजयंती आणि राम मंदिराच्या निमित्ताने आनंदाचा शिधाचं वाटप केला जाणार आहे. याआधी आनंदाचा शिधा हा दिवाळी दसरा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त दिला जात होता. जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत हा आनंदाचा शिध्याच वाटप केलं जाणार आहे. फक्त शंभर रुपयांमध्ये एक किलो रवा, एक किलो चनाडाळ, एक किलो साखर आणि एक किलो तेल देण्यात येईल असं राज्य सरकारने जाहीर केलंय
मंत्रिमंडळाच्या बैठकीतील धडाकेबाज निर्णय
- राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित (SAM) बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता.
- ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नविन लेखाशिर्ष उघडण्यास मंजुरी
- शासकिय लेख्यातून (मकोनी नमुना क्रमांक 44 द्वारे) आहरित करण्यात आलेल्या सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आहरण व संवितरण अधिकारी आणि अन्य अशासकीय कार्यान्वयन प्राधिकारी यांच्याकरिता आभासी वैयक्तिक ठेव लेखा कार्यपद्धती लागू करण्यास मंजुरी.
- 'सत्यशोधक' मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी
- जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मंजुरी
- पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान .50 हजारांवरूनएक लाखांपर्यंत करण्यास मान्यता
- महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम,1999 लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरीत न झालेल्या गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरुपात आर्थिक पॅकेज देणार
- राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रति शिधापत्रिका आनंदाचा शिधा देण्यास मंजुरी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)