एक्स्प्लोर
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे 9 निर्णय
रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली.
मुंबई: रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध आहे.
त्यामुळे शिवसेनेचे मंत्री या बैठकीसाठी रणनिती आखून आले होते. बैठकीपूर्वी शिवसेनेचे मंत्री हे सुभाष देसाईंच्या दालनात जमले. त्यानंतर त्यांनी बैठकीला हजेरी लावली.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय झाले?
- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ 2001 ते 2009 मधील थकित खातेदारांना देण्याचा निर्णय.
- मुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे जालना येथे उपकेंद्र स्थापन करण्यासाठी 396 कोटींचा खर्च आणि आवश्यक पदांस मान्यता.
- बृहन्मुंबईतील शासकीय जमिनींवरील संपुष्टात आलेल्या भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणासंबंधीच्या धोरणात सुधारणा करण्यास मान्यता.
- भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या निर्वासित-विस्थापितांना देण्यात आलेल्या जमिनीच्या धारणाधिकाराचे सर्वेक्षण करून पुनर्विलोकन करण्याचा निर्णय.
- कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळावर निवडणुकीसाठी व्यापारी आणि अडते या घटकातील मतदार होण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियम-1963 मध्ये सुधारणा.
- राज्य कामगार विमा योजनेसाठी राज्य कामगार विमा सोसायटी स्थापन करण्याचा निर्णय.
- यवतमाळ जिल्ह्यातील देवधर (ता. राळेगाव) येथील बिरसा मुंडा आदिवासी सहकारी सूतगिरणीची शासकीय अर्थसहाय्यासाठी निवड.
- वन विभागातील योजना-योजनेत्तर फंडातून वेतन घेणाऱ्या आणि नियमित करण्यास पात्र असणाऱ्या उर्वरित 569 कामगारांना कायम करण्याचा निर्णय.
- भूमिगत नळमार्ग टाकणे आणि भूमिगत वाहिन्या बांधण्यासाठी जमिनीमधील वापर हक्काचे संपादन करण्यासह त्यांच्याशी संबंधित इतर बाबींसाठी तरतूद करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
व्यापार-उद्योग
नाशिक
Advertisement