एक्स्प्लोर

Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारचा आज शपथविधी, 18 मंत्री घेणार शपथ? जाणून घ्या

Maharashtra Cabinet Expansion : सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे (Eknath Shinde) गटाचे सात मंत्री तर भाजपकडून (BJP) 11 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

Maharashtra Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होणार असून सकाळी 11 वाजता राजभवन या ठिकाणी 18 मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये शिंदे (Eknath Shinde) गटाचे सात मंत्री तर भाजपकडून (BJP) 11 जणांचा शपथविधी होण्याची शक्यता असून आत्तापर्यंत 9 नावांवर भाजपकडून शिक्कामोर्बत झाल्याची माहिती आहे. उर्वरित दोघांमध्ये एक महिला आमदार शपथ घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यसह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.

शिंदे गटाच्या सात जणांची यादी तयार, मंत्रिपदासाठी अनेकांची जोरदार फिल्डिंग 

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर शिंदे सरकारला मुहूर्त सापडला आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी नंदनवन येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यात काही तास चर्चा झाली. शिंदे गटामध्ये मंत्रीपदासाठी जोरदार चुरस असल्याचं दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला मंत्रिपद मिळावं यासाठी अनेकांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या आज होणाऱ्या शपथविधीसाठी शिंदे गटाच्या सात जणांची यादी तयार असल्याची खात्रीलायक माहिती एबीपी माझाकडे आहे. यामध्ये उदय सामंत, दादा भुसे, संजय शिरसाठ, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांचे नाव असल्याची माहिती आहे. शिंदे गटाकडून हे मंत्री आज शपथ घेणार आहेत. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवार यांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाजपच्या मंत्र्यांची यादी ठरली असून टप्प्याटप्प्याने त्यांच्याशी संपर्क साधला जात असल्याची माहिती आहे. 

शिंदे गटाकडून हे मंत्री शपथ घेतील
1) उदय सामंत
2) दादा भुसे
3) संजय शिरसाठ
4) संदीपान भुमरे
5) गुलाबराव पाटील
6) भरत गोगावले 
7) शंभूराज देसाई

भाजपकडून हे मंत्री शपथ घेतील

1) चंद्रकांत दादा पाटील
2) राधा कृष्ण विखे पाटील
3) सुधीर मुनंगटीवार
4) गिरिष महाजन
5) सुरेश खाडे, मिरज
6) अतुल सावे
7) मंगल प्रभात लोढा 
8) रवींद्र चव्हाण
9) विजयकुमार गावित

राज्याचे विधीमंडळाचे अधिवेशन 10 ऑगस्टपासून

राज्याच्या विधीमंडळाच्या अधिवेशनाला (Maharashtra Assembly Session) बुधवार, 10 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. विधीमंडळ सचिवालयाकडून याबाबत परिपत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजाकरीता मंगळवार, 9 ऑगस्ट, 2022 रोजी सार्वजनिक सुट्टी असली तरी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे कार्यालय सुरु राहील. तसेच मंगळवार  9 ऑगस्ट ते गुरुवार, 18 ऑगस्ट, 2022 या कालावधीत रजेवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या

Maharashtra Cabinet Expansion : शिंदे गटाचं ठरलं; उदय सामंत, दादा भूसे, गुलाबराव पाटील यांच्यासह हे सात मंत्री शपथ घेणार, सत्तारांचा पत्ता कट?

Maharashtra Cabinet Expansion : मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं अखेर ठरलं! तारीख अन् वेळ निश्चित, राजभवनावर शपथविधी


Maharashtra TET Scam : टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुलांची नावं; प्रमाणपत्र रद्द, सत्तार म्हणाले..

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Embed widget