राज्यातील शेतकरी कंत्राटी ग्रामसेवकांसाठी खुशखबर; ग्रामसेवकांच्या वेतनात 10 हजार रुपयांची वाढ तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 1500 कोटी मंजुर
Cabinet Decision: पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करण्यात येणार असून 1500 कोटीची मान्यता देण्यात आला आहे.

Cabinet Decision: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.आजच्या बैठकीत शेतकऱ्यांना आणि कंत्राटी ग्रामसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात तब्बल 10 हजार रुपयांची वाढ होणार आहे. तर पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करण्यात येणार असून 1500 कोटीची मान्यता देण्यात आला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
- सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करणार असून 1500 कोटीस मान्यता
- कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधनात वाढ करण्याचा निर्णय, आता मिळणार 16 हजार रुपये
कंत्राटी ग्रामसेवकांना सध्या सहा हजार रुपयांचा वेतन आहे ते थेट 16 हजार रुपये करण्यात आले आहे. कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात यावी अशी अनेकदा मागणी झालेली होती. मात्र सरकारने थेट दहा हजार रुपयांची वाढ करण्याचा आज निर्णय घेण्यात आला आहे
- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा.
- पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती वाढवली.
- लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार
- पुणे येथे चार अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार
- अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ
- मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरता पुनर्वसन गृहे योजना
- स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा वाढविली
- चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
