The Kashmir Files: तर चित्रपटातून कमावलेले 150 कोटी काश्मिरी पंडितांच्या घरबांधणीसाठी द्यावे: जयंत पाटील
Devendra Fadnavis Vs Jayanat Patil: 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटावरून देशात जोरदार चर्चा सुरू असून यावरून अनेक वाद ही होताना दिसत आहेत.
Devendra Fadnavis Vs Jayanat Patil: 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटावरून देशात जोरदार चर्चा सुरू असून यावरून अनेक वाद ही होताना दिसत आहेत. यामध्येच काँग्रेससह इतर विरोधी पक्ष नेत्यांनी संसदेत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आता याचेच पडसाद महाराष्ट्रातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही पाहायला मिळाले आहेत. विधानसभेत बोलण्यासाठी मिळणाऱ्या वेळेवरून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सदनात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी द कश्मीर फाइल्स या चित्रपटावर भाष्य करत म्हणाले की, काल आम्ही ठरवलं होतं आणि आम्ही कश्मीर फाइल्स पाहायला गेलो होतो, तुम्हाला काही अडचण आहे का? असा प्रश्न त्यांनी सत्ता पक्षाला केला. यावरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले जयंत पाटील?
यावेळी विधिमंडळात बोलताना जयंत पाटील यांनी फडणवीस यांना टोला लगावत म्हटलं आहे की, कश्मीर फाइल्स इंटरव्हलनंतर फार बोरिंग सिनेमा आहे. फार इंटरेस्टिंग नाही. कश्मीर फाइल्सचं इतकं कौतुक असले तर 17 कोटींच्या चित्रपटाने 150 कोटी कमावले, तितके पैसे या चित्रपटाच्या प्रोड्युसरने कश्मीरी पंडितांच्या घरबांधणीसाठी द्यावेत, असं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, आज विधिमंडळात बोलण्यासाठी मिळणाऱ्या वेळेवरून सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षात चर्चा झाली. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सदनात चर्चसाठी 50 टक्के वेळ जर सत्ता पक्षाला मिळत असले, तर 50 टक्के वेळ विरोधी पक्षाला मिळायला हवा, अशी मागणी केली आहे. तसेच काँग्रेसला एक तास चर्चेसाठी वेळ निश्चित करून दिला असताना ही त्यांनी अधिक वेळ घेतल्याचं ते म्हणाले आहेत. यावरच बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसने एक तासाहून कमी वेळ चर्चेसाठी घेतला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :