(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra budget : सांगलीत रासायनिक खत खरेदी करताना झालेल्या प्रकाराबद्दल केंद्राला कळवणार : मुख्यमंत्री
Maharashtra budget session 2023 : सांगलीत रासायनिक खत खरेदी करताना झालेल्या प्रकाराबद्दल केंद्राला कळवणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Maharashtra budget session 2023 : रासायनिक खत (Fertilizer) खरेदी करताना आता शेतकर्यांना (Farmers) पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत आहे. हा प्रकार सांगलीत (Sangli) घडला आहे. जात विचारुन खतं देत असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकरी आणि सभागृहाची भावना लक्षात घेऊन याबाबत आम्ही केंद्राला कळवणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
विरोधकांचा भ्रमाचा भोपळा फुटला
काल ज्या प्रकारे अर्थसंकल्प मांडला आहे, त्यामुळं विरोधकांचा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. त्यामुळे त्यांची परिस्थिती समजून घ्या असेही मुख्यमंत्री म्हणाले. रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्यांना पॉस मशीनवर आपली जात सांगावी लागत आहे. त्यामुळे दुकानदार आता जात विचारुन खतं देत असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. सांगली जिल्ह्यात सहा मार्चपासून शेतकऱ्यांसाठी जातीची अट बंधनकारक करण्यात आली आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात असं होणं योग्य नाही : अजित पवार
सांगलीत घडलेल्या प्रकारावरुन विधीमंडळात विरोधकांनी संताप व्यक्त केला. सांगली जिल्ह्यात जर शेतकऱ्यांना खत घ्यायचे असेल तर त्यांना आधी जात सांगावी लागत आहे. मात्र, शेतकऱ्यांना जात नसते असे अजित पवार म्हणाले. याबाबत शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. शेतकऱ्यांनी जातीचा रकाना भरल्याशिवाय फॉर्म भरला जात नाही. पुरोगामी महाराष्ट्रात असं होण योग्य नसल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. सांगली जिल्ह्यात सॉफ्टवेअरमध्ये झालेला बदल वरच्या स्तरावरुन झालेला आहे. हा बदल केंद्र सरकारकडून झाल्याची माहिती मिळाल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
केंद्राच्या खत मंत्रालयामार्फत पॉस मशीन ही यंत्रणा सुरु
पॉस मशीन ही यंत्रणा केंद्र शासनाच्या खत मंत्रालयामार्फत चालवली जाते. त्यामुळे कृषी विभागात देखील या प्रकाराबाबत काही माहिती नसल्याची सध्या माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची जात गोळा करुन आणखी कोणत्या नव्या चक्रव्यूहात अडकवण्याचा उद्योग तरी सुरु झाला नाही ना? अशी शंका उपस्थित झाली आहे. शेतकऱ्यांना आता जात दाखवल्याशिवाय खत मिळणार नाहीत, असा नवा नियम आता लागू करण्यात आला आहे. रासायनिक खत घेताना दुकानदाराकडे "ई पॉस" मशीनवर शेतकऱ्यांना त्यांची जात लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: