Maharashtra Breaking Updates: मुंबई, ठाणे, पालघरसह तळकोकण आणि विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट
Maharashtra Breaking Updates: मुंबई, ठाणे, पालघरसह तळकोकण आणि विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात कालच्या पावसामुळे शेतीपिकांचं प्रचंड नुकसान झाले आहे.
LIVE

Background
Maharashtra Breaking Updates: हिंदीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंचा 5 जुलैला मुंबईत एकत्र मोर्चा निघणार आहे. मनसेप्रमुख राज ठाकरेंनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना फोन केला होता. मराठी भाषेसाठी दोन मोर्चे निघणं योग्य दिसत नसल्याचं मत राज ठाकरेंनी मांडलं. यानतर उद्धव ठाकरेंनेही एकत्र मोर्चा काढण्याची तयारी दर्शवली. यासह मुंबई, ठाणे, पालघरसह तळकोकण आणि विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात कालच्या पावसामुळे शेतीपिकांचं प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच 'कांटा लगा गर्ल' आणि 'बिग बॉस 13' मधील स्पर्धक शेफाली जरीवाला (42) हिचं हृदयविकाराचा झटक्यानं निधन झालं आहे. राज्यातील या घडामोडींसह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, पाहा एका क्लिकवर...
धाराशिव जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दारूच्या नशेत
धाराशिव जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दारूच्या नशेत
धाराशिव मधील परंडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक येथील धक्कादायक प्रकार
बीएम मोहोळकर असं शिक्षकाचे नाव यापूर्वीही नशेत शाळेत येण्याबद्दल समज दिल्याची माहिती
शिक्षक दारूच्या नशेत आल्याने मुख्याध्यापकाने आणून दिले निदर्शनास
शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षकाचा नशेतला व्हिडिओ केला शूट
समज देऊनही शिक्षकाच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने कारवाईची मागणी
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून निलंबन
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून निलंबन
सपाटे यांच्या विरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांची कारवाई
सपाटे यांच्या विरोधात दाखल विनयभंगच्या गुन्ह्याचा अहवाल पक्षाकडे पाठवण्यात आला होता
वरिष्टांच्या सूचनेनुसार मनोहर सपाटे यांना पक्षातून निलंबित करत असल्याची शरद पवार गटाची माहिती
माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या विरोधात सोलापुरात एका महिलेने विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवलाय
त्यानंतर आता पक्षाने देखील सपाटे यांच्यावर कारवाई केलीय























