Maharashtra Breaking News Updates : महाराष्ट्रासह देशभरातील महत्वाचे अपडेट्स, वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Maharashtra Breaking News Updates : आज देशभरात रामनवमीचा उत्सव साजरा केला जातोय. राज्यातील विविध भागांतून रामभक्त प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगेत उभे राहून विविध मंदिरांना भेट देतायत. तसेच, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाशिम दौरा आहे. या घडामोडींसह महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
गोखले इन्सटीट्युटची मातृसंस्था असलेल्या भारत सेवक समाज संस्थेचे सचिव मिलिंद देशमुख यांना ९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी
पुणे
गोखले इन्सटीट्युटची मातृसंस्था असलेल्या भारत सेवक समाज संस्थेचे सचिव मिलिंद देशमुख यांना ९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी
गोखले इन्स्टिट्युटची 1 कोटी 42 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी देशमुख यांना अटक करण्यात आली आहे
पुणे पोलिसांनी देशमुख यांना न्यायालयात हजर केले होते
न्यायालयाने देशमुख यांना ९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे
नागपूर येथील सर्व्हटस ऑफ इंडिया सोसायटीची जागा फ्रि होल्ड करण्यासाठी दीड कोटी रुपयांची मागणी करुन गोखले इन्स्टिट्युट या संस्थेकडील शासकीय अनुदान व फीच्या रक्कमेतून १ कोटी ४२ लाख रुपये सर्व्हटस ऑफ इंडिया सोसायटीचे इतर सदस्यांची पूर्वपरवानगी न घेता़ संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी मिलिंद देशमुख यांच्यावर गुन्हा
देशमुख यांच्यासह याप्रकरणात आणखी काही जणं असल्याचा पोलिसांना संशय
भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर
संजय राऊतांची स्मृती कमजोर, देवेंद्र फडणवीस काळाराम मंदिरात गेले होते
संजय राऊत यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावेत, खर्च आम्ही करू
२२ जानेवारी २०२४ रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या मंदिरातील दर्शनाचा व्हिडिओ ट्विट
भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर
भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी एक्सवरून काय म्हटलंय पाहुयात
संजय राऊतांची स्मरणशक्ती अलिकडे संपत चाललीय.
ते म्हणतात, देवेंद्र फडणवीस 25 वर्षांत काळाराम मंदिरात गेले नाहीत.
22 जानेवारी 2024 ला फडणवीसच काय, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा काळाराम मंदिरात आले होते. तेथे स्वच्छता अभियान त्यांनी केले. अयोध्येतील राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी पंतप्रधानांनी जे व्रत स्वीकारले होते, त्याची सुरुवातच त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरातून केली होती.
हवं तर त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावेत. त्याचा खर्च आम्ही करू.























