Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News Live Updates: महाकुंभ मेळाव्यात संगम किनाऱ्यावर चेंगराचेंगरीची घटना घडली. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. यासह विविध बातम्यांचे अपडेट्स...

Background
Maharashtra Breaking News Live Updates: प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्यात संगम किनाऱ्यावर चेंगराचेंगरीची घटना घडली. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. अमृतस्नानापूर्वी रात्री दीडच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. संगम किनाऱ्यावर मौनी अमावस्येमुळे करोडो भाविकांची गर्दी जमली होती. भाविकांच्या गर्दीमुळे काही महिला खाली पडून गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. चेंगराचेंगरीनंतर १३ आखाड्यांनी अमृतस्नान कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राज्यात विविध घटना घडत आहे. अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी देखील अपडेट्स समोर येत आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणी वाल्मिक कराडबाबत विविध माहिती समोर येत आहे. यासह देशभरातील विविध बातम्यांचे अपडेट्स...
दुख:द बातमी! जेष्ठ गांधीवादी मा. म. गडकरी यांचे निधन
वर्धा: सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष आणि जेष्ठ गांधीवादी मा. म. गडकरी यांचे आज निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. मा. म. गडकरी हे सण 2008 ते 2013 पर्यत सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहिले आहेत. ते बालपणापासून गांधी विचाराशी जुडून राहिले होते. दरम्यान, आचार्य विनोबा भावे यांच्यासोबत देखील विविध चळवळीत त्यांनी काम केले होतं. सोबतच त्यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रचार प्रसार केला. तसेच ते दारुबंदी चळवळीत ही सक्रिय राहिले आहेत. मा. म. गडकरी हे मूळचे वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील हिवरा या गावचे रहिवासी होते. दरम्यान नागपूर येथील निवसस्थानी आज सकाळी साडेदहा वाजता त्यांचे दुख:द निधन झाले आहे. या बातमीने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मोर्चेबांधणी; वरिष्ठ नेत्यांची बैठका सुरु
भाजपकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरु असल्याची माहिती पुढे आली आहे.
भाजपचे सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न होत आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण बैठकीस उपस्थित झाले आहे.
भाजप सदस्य नोंदणी बाबतीत आढावा घेतला जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे.























