Maharashtra Breaking News LIVE:राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा; एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News Live Updates: राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...
LIVE
Background
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. तर चीनमध्ये कोविड-19 साथीच्या आजारानंतर पाच वर्षांनी एक नवीन आरोग्य संकट उद्भवले आहे. बीडचे मस्साजोग येथील सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
राम शिंदेंच्या सत्कार सोहळ्याकडे भाजप नेत्यांनी फिरवली पाठ
अहिल्यानगर: विधानपरिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची निवड झाल्याबद्दल आज अहिल्यानगर शहरात शिंदे यांचा सर्वपक्षीय सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलाय. अहिल्यानगर शहरातील माऊली सभागृहात हा सत्कार सोहळा होत असून या सर्वपक्षीय सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे असून या सोहळ्याला पोपटराव पवार, आ. सत्यजित तांबे, आ. हेमंत ओगले यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती आहे.
मात्र या सत्कार सोहळ्याला भाजप आमदारांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्री राधाकृष्ण विखे, आ. शिवाजी कर्डीले, आ. मोनिका राजळे यांची मात्र या सत्कार सोहळ्याला सध्यातरी उपस्थिती दिसत नाही. शिर्डी येथे होणाऱ्या भाजप प्रदेश मेळाव्याच्या तयारीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक होत असल्याने सर्व आमदार त्या बैठकीसाठी गेले असल्याची माहिती आहे...मात्र भाजपच्याच नेत्यांचीच उपस्थिती नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आंतरराष्ट्रीय निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन
बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त आज बारामतीत आंतरराष्ट्रीय निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. नामांकित मल्लांच्या चित्तथरारक लढती होणार असून या आखाड्यात इतर तुल्यबळ अशा सुमारे दीडशे कुस्त्या होणार आहेत. बारामती तालुका कुस्ती संघ व युगेंद्र पवार युवा मंच यांच्या वतीने या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी साडेपाच वाजता शरद पवार बारामतीतील शारदा प्रांगण या ठिकाणी कुस्त्यांना हजेरी लावतील.
ठाण्यानंतर पुण्यात हिंदी-मराठी वाद पेटला; मनसेच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला
ठाणे : ठाण्यानंतर आता पुण्यात हिंदी-मराठी वाद पेटला असल्याचे पुन्हा एकदा बघायला मिळाले आहे. परिणामी, मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या एअरटेल, वाकडेवाडी येथील शाहबाज अहमद या टिम लीडरला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईल चोप दिला आहे. एअरटेलच्या कर्मचारी वर्गाला फ्लोअरवर हिंदीच बोलायचं, मराठी बोलले तर कामावरून काढून टाकेल जाईल असा इशारा देण्यात आला. सोबतच हिंदू सणांना सुट्टी न देणे तसेच गेले 3 महिने मराठी पोरांचा पगार केला नसल्याचे पुढे आले आहे.
त्यावर येथील कामगारांनी मनसेकडे तक्रार केली की आमचा पगार थांबवला आहे. म्हणून त्या शाहबाज अहमद ने आपल्या मराठी पोरांना धमकी दिली की कोनसी भी सेना लेके आओ, नही बोलता मराठी आणि कामावरून काढून टाकतो बघू कोण येतंय. असा धमकी वजा इशारा दिला. या मराठी पोरांच्या अन्यायाला काल मनसे स्टाईलने वाचा फोडली आणि येत्या सोमवारी पोरांचे पगार करायला लावले आहेत. अन्यथा एकाच वेळी एकाच दिवशी स्वारगेट, वाकडेवाडी, खराडी येथील 3 एअरटेल ऑफिस फोडून टाकणार, असा अंतिम इशारा मनसेकडून राज्य सचिव आशिष साबळे पाटील यांनी दिला आहे.