Maharashtra Breaking Live Updates: फडणवीस, शिंदे, अजित पवार तिघेही राजभवनात पोहोचले
Maharashtra Election Results News Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

Background
मुंबई : राज्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. जागोजागी शेकोट्या पेटताना दिसत आहेत. दुसरीकडे राज्यात नव्या सरकार स्थापनेसाठी लगबग चालू आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) असण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी नव्या सरकारमध्ये जास्तीत जास्त मंत्रिपदं आपल्याच पक्षाला मिळावीत यासाठी महायुतीतील घटकपक्षांचा प्रयत्न चालू आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार (Ajit Pawar) दिल्लीमध्ये जाऊन भाजपाच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत. तर शिवसेनेचे (Shivsena) प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेदेखील महत्त्वाच्या खात्यांसाठी आग्रही आहेत. त्यामुळे आता नव्या सरकारमध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार? तसेच नव्या मंत्रिमंडळात नेमका कोणा-कोणाचा समावेश होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या सर्व प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर..
फडणवीस, शिंदे, अजित पवार तिघेही राजभवनात पोहोचले
शिवसेना एकनाथ शिंदे, भाजप देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी अजित पवार तिन्ही नेते एकाच गाडीतून राज भवनावर पोहचले आहेत
सत्तास्थापनेसाठी हालचाली वाढल्या, भाजपाचे बडे नेते राजभवनावर दाखल
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,आमदार प्रवीण दरेकर आमदार प्रसाद लाड आणि पंकजा मुंडे राज भवनावर पोहचले






















