Maharashtra Breaking News: हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस; उद्धव ठाकरे नागपुरात दाखल
Maharashtra Breaking News 17th December 2024 Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
LIVE
Background
Maharashtra Breaking News 17th December 2024 Live Updates: महाराष्ट्र विधिमंडळाचे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज विरोधक आक्रमक होणार आहेत. परभणी बीडच्या मुद्द्यावरती विरोधक सरकारला घेण्याचा प्रयत्न करतील. ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल नसल्याने भुजबळांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर थेट नाशिकला जण पसंद केल आहे. देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या पार्थिवाच्या दर्शनाला रोहित पवारांची उपस्थिती
परभणी: परभणीतील आंबेडकर चळवळीचे जेष्ठ नेते विजय वाकोडे हे काल सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना अस्वस्थ जाणवत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनाची बातमी रोहित पवार यांना समजल्यानंतर त्यांनी आज परभणी शहरातील राहुल नगर येथे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन आदरांजली अर्पण केली आहे. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.

मी अजिबात नाराज नाही, तरुणांना संधी दिली यात मला आनंद; धर्मरावबाबा अत्राम यांची स्पष्टोक्ती
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) रविवारी झाला. यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले असल्याने अनेक राजकीय घडामोडी घडत असताना मी नाराज नाही, आता पक्ष संघटनेचं मला काम करायचं असल्याचे मत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी व्यक्त केलं आहे. यावेळस मी मंत्री झालो नसलो तरी भविष्यात मी निश्चित मंत्री बनेल, असा विश्वास ही धर्मराव बाबा अत्राम यांनी व्यक्त केला. मी नाराज नाही, आता पक्ष संघटनेचं मला काम करायचं आहे. तरुणांना संधी दिली यात मला आनंद आहे.

माझी शून्य टक्के नाराजी; राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांची स्पष्टोक्ती
अजित पवार यांना भेटायला गेलो होतो, मात्र त्यांची भेट झाली नाही.
अजित पवार कुठे आहेत ते माहिती नाही. मात्र संध्याकाळपर्यंत वेळ मिळेल असं सांगण्यात आलंय.
भुजबळ आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी नाराजी रास्त आहे.
मात्र, आमचे वरीष्ठ नेते त्यांच्या संपर्कात नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करु
तसेच माझी शून्य टक्के नाराजी आहे. अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे.