Maharashtra Breaking 29th August LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
Breaking News Live Updates : राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Background
Breaking News Live Updates : देश-विदेशासह राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
1. विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होण्याची शक्यता बळावली, 12 ते 18 नोव्हेंबरदरम्यान दोन टप्प्यांत मतदानाची शक्यता
2. शिवरायांच्या पुतळा पडण्याची कारणं शोधण्यासाठी नौदल आणि राज्य सरकारची संयुक्त समिती, वर्षावरील बैठकीत निर्णय, तर नव्या भव्य पुतळ्यासाठी स्वतंत्र समिती
3. पुतळा कोसळल्याप्रकरणी अजित पवार गटाचं आज राज्यभर मूक आंदोलन, सत्ताधारी पक्षच रस्त्यावर उतरणार
4. मनोज जरांगे 1 सप्टेंबरला राजकोट किल्ल्याला भेट देणार, कोसळलेल्या पुतळ्यावरून राजकारण नको, जरांगेंचं आवाहन
5. नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमध्ये आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या शिवसृष्टीचे उद्या लोकार्पण, शिवसृष्टीत आहे शिवरायांचा 32 फुटांचा पुतळा...
Akola News : अकोल्यात राष्ट्रीय समाज पक्षाच्या 21 वा वर्धापन दिन कार्यक्रम
Akola News : अकोल्यात राष्ट्रीय समाज पक्षाच्या 21 व्या वर्धापन दिन कार्यक्रमाला अकोल्यात सुरूवात. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकरांसह देशभरातून नेते उपस्थित. अकोल्यातील मराठा मंडळ सभागृहात होतो आहे वर्धापन दिन कार्यक्रम. पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर व्यासपीठावर न बसता खाली कार्यकर्त्यांमध्ये बसलेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रासप आणि महादेव जानकर काय निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे दुर्लक्ष.
Hingoli : हिंगोली मधील तलाठी खून प्रकरणी आज काम बंद आंदोलन
Hingoli : वसमत तालुक्यातील आडगाव येथील तलाठी संतोष पवार यांचा काल एका इसमाने मिरची पावडर तोंडावर फेकत चाकूने हल्ला करत निर्घृणपणे खून केला आहे तलाठीच्या कार्यालयातच हा खून झाल्याने या खुनाचे पडसाद आज राज्यभर पाहायला मिळत आहेत तलाठी महासंघाच्या वतीने आज राज्यभर काम बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे त्यानुसार आज हिंगोली मध्ये सुद्धा महसूल विभागातील वेगवेगळ्या संघटनांच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे यानुसार हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूल विभागातील तलाठी मंडळ अधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा या कामधंदा आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत या प्रकरणातील आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा द्या अशीच मागणी यावेळी आंदोलन कर्मचाऱ्यांनी केली आहे























