Maharashtra Breaking 25th June LIVE Updates: ओम बिर्लाच पुन्हा एनडीएचे स्पीकरपदाचे उमेदवार; आज नामांकन अर्ज भरणार
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

Background
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
1. संसदेच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बंगालसह 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 278 खासदारांचा शपथविधी सोहळा
2. लोकसभेतील विरोधी पक्षनेता आज ठरणार, राहुल गांधींच्या नावासाठी काँग्रेस आग्रही
3. रवींद्र वायकरांना खासदारपदाची शपथ घेऊ देणार नाही, शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांचा इशारा, आज वायकरांच्या शपथविधीकडे राज्याकडे लक्ष
4. इंडिया आघाडीच्या खासदारांची सकाळी 10 वाजता बैठक, लोकसभा अध्यक्षपदाची ठरणार रणनीती
5. महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी बैठक, विधानसभा जागावाटप आणि रणनीतीवर चर्चा होणार
6. अजित पवारांसोबतच्या सर्वच आमदारांना प्रवेश बंदी नाही, शरद पवारांची एबीपी माझाला माहिती, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आमदार परत येण्याचा पवारांना विश्वास
7. लातूर नीट पेपरफुटीप्रकरणी दुसरा आरोपीही अटकेत, पोबारा केलेल्या संजय जाधवच्या लातूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
8. पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी, अल्पवयीन मुलाच्या आत्याच्या याचिकेवर निर्णयाची शक्यता
9.पोर्शे कार अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट... दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
10. फर्ग्युसन रस्त्यावरच्या ड्रग्ज प्रकरणानंतर आणखी एक व्हिडीओ समोर, पुणे-नगर रस्त्यावरच्या मॉलमध्ये 2 तरुणी ड्रग्जसेवन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल
NEET Paper Leak Case : नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी संजय जाधव यास सहा दिवसाची पोलीस कोठडी
NEET Paper Leak Case : नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी संजय जाधव यास सहा दिवसाची पोलीस कोठडी. संजय जाधव दिल्ली आणि लातूर यामधील दुवा होता. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात गाजत असलेलं नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूर पर्यंत आहेत. या प्रकरणात चार लोकांविरोधात लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यातील जलील खान पठाण याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. यातील फरारी संजय जाधव यास काल अटक करण्यात आली. आज लातूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले.. संजय जाधव यास सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Bhiwandi : भिवंडी रेड्याच्या हल्ल्यातील एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू; सीसीटीव्ही व्हायरल
Bhiwandi : बकरी ईद निमित्त भिवंडी शहरात कुर्बानी साठी मोठ्या प्रमाणावर रेडे म्हैस यांची खरेदी झाली असताना शहरातील हंडी कंपाऊंड येथे 12 जून रोजी सायंकाळी एका रेड्याचा ताबा सुटून 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. यामधील गंभीर जखमी असलेल्या नियाज अहमद वय 24 वर्ष या युवकाचा उपचारा दरम्यान मुंबई येथील जे जे रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या रेड्याच्या हल्ल्यात एक महिला व तीन पुरुष जखमी झाले होते. त्यावेळी रस्त्यातून जात असलेल्या नियाज अहमद यांच्या पोटात रेड्याचा शिंग लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता.या घटनेचा थरार सीसीटिव्ही कैद झाला होता. या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात रेडा मालक तारिफ फारुकी या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.






















