Maharashtra Breaking 24th June LIVE Updates: जालन्यातील रायगव्हाण गावात राजकीय नेत्यांना गावबंदी
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
LIVE
Background
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
Jalna News: जालन्यातील रायगव्हाण गावात राजकीय नेत्यांना गावबंदी
Jalna News: जालन्यातील परतूर तालुक्यातील रायगव्हाण गावात राजकीय नेत्यांना गावबंदीचा फलक लावण्यात आला आहे. ओबीसी नेता सोडता अन्य कोणत्याही नेत्यांना गावात प्रवेश करू नये तसे झाल्यास मोठा अवमान करण्यात येईल असा इशाराही या फलकावर देण्यात आलंय. दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी हा निर्णय अयोग्य असल्याच म्हटलंय.
Pune News: डीजेचा दणदणाट, बेधुंद तरुणाई, L3 बार मधील आणखी 2 व्हिडीओ समोर
Pune News: डीजेचा दणदणाट, बेधुंद तरुणाई, L3 बार मधील आणखी 2 व्हिडीओ समोर
"त्या" पार्टीचे आणखी काही व्हिडिओ समोर
रविवारी पहाटे 4 पर्यंत सुरू होती पार्टी
40 ते 50 जणांची पुण्यातील एफ सी रोड असलेल्या L3 बार मधील पार्टीचे व्हिडीओ आले समोर
हातात मद्याचे ग्लास, डी जे चा मोठा दणदणाट तरुणाई कडून सुरू होता या बार मध्ये जल्लोष
Pune News: इंदापुरात विहिरीत पाय घसरुन पडल्यामुळे मुलीचा मृत्यू
Pune News: इंदापूर तालुक्यातील राजवडी पाटी येथे पंधरा वर्षीय मुलगी विहिरीत पाय घसरुन बुडाल्याचा अंदाज आहे. सारिका पिराजी शिंदे असं या मुलीचं नांव असून आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारासती या विहिरीवरती पाणी आणण्यासाठी गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. इंदापूर पोलीस आणि महसूल प्रशासन या ठिकाणी दाखल झाला असून या बुढेलेल्या मुलीचा शोध घेतला जातोय. सारिका पिराजी शिंदे वय 15 वर्षे राहणार परतुर तालुका परतुर जिल्हा जालना ही मुलगी आज सकाळी साडेसात वाजता राजवडी तालुका इंदापूर येथील विहिरी वरती पाणी भरणे कामी गेली असताना पाय घसरून पाण्यात बुडाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने तिचा शोध सुरू आहे.
Beed News : बीड येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात 11 जुलै रोजी मराठा आरक्षण जनजागृती, शांतता रॅलीचं आयोजन
Beed News : बीडमध्ये मराठा आरक्षण जनजागृती तथा शांतता रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. मनोज जरांगे स्वतः या रॅलीचे नेतृत्व करणार आहेत. यासाठी बीड येथे रविवारी सकल मराठा समाजाकडून व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत तालुका निहाय नियोजनाचा आढावा घेण्यात आला. यासाठी बीड जिल्हाभरातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.ही रॅली 11 जुलै रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात होणार असल्याने यासाठी जिल्ह्यातील सकल मराठा समाजातील महिला, पुरुष, युवक, युवती सहभाग नोंदवणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.
मुस्लिम समाजाला शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये 5 टक्के आरक्षण द्या : सचिन खरात
मुस्लिम समाज महाराष्ट्र राज्यामध्ये गरीब असल्यामुळे शिक्षणात अत्यल्प समाज आहे, तसेच मुस्लिम समाजामध्ये सहा ते बारा वयोगटातील 75 टक्के मुलं गरीब असल्यामुळे शिक्षणापासून वंचित आहेत, मुस्लिम समाज खाजगी नोकऱ्यांमध्ये आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये दोन टक्के आहे यामुळे मुस्लिम समाज हा शिक्षणापासून आणि नोकऱ्यांपासून वंचित असल्यामुळे मुस्लिम समाजाची गरीब परिस्थिती आहे त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मागणी करता येईल मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण जाहीर करा अशी विनंती करत आहे.