Maharashtra Breaking LIVE 21st August: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra Breaking 21st August 2024 Marathi News LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहा फक्त एबीपी माझावर...

Background
Maharashtra Breaking 21st August 2024 Marathi News LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहा फक्त एबीपी माझावर...
1. तब्बल 12 तासांनी पोलिसांनी आंदोलन पांगवलं, आंदोलकांवर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, काही आंदोलक ताब्यात
2. आंदोलन पांगवल्यानंतर आंदोलकांकडून स्टेशनबाहेरील वाहनांची तोडफोड. जमावाकडून एसटी बसवर दगडफेक तर एका पोलिसाची खासगी गाडीही फोडली
3. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज, पोलिसांवर आंदोलकांची दगडफेक, दगडफेकीत पोलीस जखमी
4. चिमुरड्यांवरील अत्याचारानंतर बदलापुरात उद्रेक, आरोपीला आमच्यासमोर आजच फाशी द्या, आंदोलकांची संतप्त मागणी
5. चिमुरड्यांवरच्या अत्याचारविरोधांत बदलापूरकरांची एकजूट, लाडकी बहीण योजना नसली तरी चालेल, मुलींना सुरक्षा द्या, आंदोलकांची भावना
Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरात तरूणाच्या जाचाला आणि धमक्यांना कंटाळून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या
Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरात तरूणाच्या जाचाला आणि धमक्यांना कंटाळून ओहर गावात 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केली. या प्रकरणात 2 जणांना अटक झालीय, तर 7 जण अजूनही मोकाट आहेत. मोकाट आरोपींकडून मुलीच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्या जात आहेत. मुलीच्या घरासमोर येऊन 'आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल' असे म्हणत चाकू, तलवार दाखवून धमकी दिल्याचा आरोप होतोय. या सर्व प्रकारामुळे संभाजीनगरात कमालीची संतापाची भावना आहे. उर्वरित आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी आज हर्सुल पॉईंटवर रास्तारोको करण्यात येणार आहे. मुलीला त्रास देणारा स्थानिक मेकॅनिक आहे. तू माझ्याशी बोलली नाहीस तर तुझ्या भावाला जिवे मारून टाकीन, अशा धमक्या तो द्यायचा. त्यामुळे या प्रकाराला कंटाळून त्या 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केली होती.
Badlapur News : बदलापूरमध्ये शाळेतील दोन विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाप्रकरणी रेल्वे ट्रॅकवर करण्यात आलेलं आंदोलन
Badlapur News : बदलापूरमध्ये शाळेतील दोन विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाप्रकरणी रेल्वे ट्रॅकवर करण्यात आलेलं आंदोलन पोलिसांच्या कारवाईनंतर संपुष्टात आले. सध्या बदलापूर बंद आहे. सर्व दुकानं बंद आहेत. आंदोलनकर्ते पुन्हा एकत्र येऊ नयेत म्हणून जमावबंदी लागू करण्यात आलीये.. दरम्यान इंटरनेट सेवाही बंद आहे.
याप्रकरणी काही लोकांना अटक केली असून आंदोलनला हिंसक वळण देणऱ्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे... आंदोलनप्रकरणी 300 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. येत्या 10 दिवसांत आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.. तसंच या प्रकरणी पोलीस अधिकारी आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलीये.























