Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी; सर्व अपडेट्स, एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Live Updates: नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसह देशभरातील इतर महत्वाचे अपडेट्स...

Background
Maharashtra Breaking News Live Updates: नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर रात्री आठ ते साडे आठच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घटली. तर
धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे सुरेश धस यांच्यावर आरोपांची राळ उठलीय. त्यावर भेटीचं बातमी फोडणं हे आपल्याविरोधातलं षडयंत्र असून त्याचा बंदोबस्त करण्याचा इशारा सुरेश धसांनी दिलाय... यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार असल्याचही त्यांनी सांगितलंय. शिवसेना ठाकरे पक्षात सध्या चिंतेचं वातावरण आहे. कोकणात राजन साळवी, पाठोपाठ सुभाष बने, गणपत कदम यांच्यासह हजारो कार्यकर्ते, शेकडो पदाधिकारी यांनी शिंदेंचं शिवधनुष्य हाती धरलं. पाठोपाठ भास्कर जाधवांनीही खंत व्यक्त केली. त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेत चिंतेचं वातावरण आहे. यासह महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसह देशभरातील इतर महत्वाचे अपडेट्स...
नागपूर जिल्ह्यातील कोतवालबड्डी येथील एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये भीषण स्फोट; दोन कामगार मृत्युमुखी पडल्याची माहिती
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलिस स्टेशन हद्दीत कोतवालबड्डी येथे एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये स्फोट...
दोन कामगार मृत्युमुखी पडल्याची माहिती...
दुपारी दोन वाजताची घटना...
कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत कोतवाल बड्डी येथे एका खाजगी एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये फटाक्यांसाठी ची बारूद तयार केली जात होती...
दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्या ठिकाणी स्फोट झाला त्यामध्ये दोन कामगार मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे...
कोळसा तंदूर भट्टी वापरणाऱ्या रेस्टॉरंट आणि ढाब्यांना मुंबई महापालिकेकडून नोटीस; नेमकं कारण काय?
कोळसा तंदूर भट्टी वापरणाऱ्या रेस्टॉरंट आणि ढाब्यांना मुंबई महापालिकेकडून नोटीस
कोळसा तंदूर भट्टी ऐवजी इलेक्ट्रिक उपकरण किंवा सीएनजी पीएनजी एलपीजीचा वापर करण्याच्या दिल्या सूचना
मुंबईतील एकही बेकरी आता जळाऊ लाकडावर चालणार नाही; त्याऐवजी सिएनजी; पीएनजी वापरावा- आयुक्तांते आदेश
कोळसा तंदूर भट्टी ऐवजी आठ जुलै पर्यंत इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर न केल्यास मुंबई महापालिकेकडून कठोर कारवाई केली जाणार
नोटीस बजावून आणि सूचना देऊन सुद्धा रेस्टॉरंट आणि ढाबा मालकांनी पालन न केल्यास परवाना रद्द करणे, दंड आणि कायदेशीर कारवाईसह कठोर कारवाई केली जाईल.
9 जानेवारीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बीएमसीच्या हद्दीत लाकूड, कोळसा किंवा इतर पारंपारिक इंधन वापरणाऱ्या हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांना सूचना देण्यात आली आहे
त्यामुळे कोळसा तंदूर भट्टीचा वापर करून तंदूर तयार करणाऱ्या हॉटेल मालकांना आता हॉटेलमध्ये बदल करावे लागणार आहेत, त्याऐवजी इलेक्ट्रिक एलपीजी पीएनजी सीएनजी व इतर ग्रीन एनर्जीचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत
त्यासोबत मुंबईतील एकही बेकरी पुढील सहा महिन्यानंतर जळाऊ लाकडावर चालणार नाही,
आतापर्यंत 84 ढाबे, हॉटेल, रेस्टॉरंट आणि तंदूर आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत























