Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी; सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Live Updates: आजपासून बारावीच्या बोर्डाची परिक्षा सुरु होणार आहे. तर आज महाराष्ट्राची कॅबिनेट बैठक होणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसह देशभरातील इतर महत्वाचे अपडेट्स

Background
Maharashtra Breaking News Live Updates: दोन महिनेआधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी, पळून गेलेल्या आरोपींचं नवं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. 9 डिसेंबर रोजी सरपंचांची हत्या झाल्यानंतर, संध्याकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेसह सहाजण धाराशिवच्या वाशी परिसरातील पारा चौकात पोहोचले आणि या परिसरात गाडी सोडून सहा आरोपी पळून गेले. यासह आजपासून बारावीच्या बोर्डाची परिक्षा सुरु होणार आहे. तसेच दिल्लीत कोण मुख्यमंत्री होणार, याबाबत चर्चा रंगली आहे. तर आज महाराष्ट्राची कॅबिनेट बैठक होणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसह देशभरातील इतर महत्वाचे अपडेट्स
नालासोपा-यात 'त्या' 41 अनधिकृत इमारतीवर वसई विरार महापालिकेची तोडक कारवाही
नालासोपारा : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 23 जानेवारीपासून सुरू असलेल्या या मोहिमेत आतापर्यंत 23 इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या असून, उर्वरित 18 इमारतींवर पुन्हा कारवाई सुरु आहे. या मोहिमेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, प्रशासनाने अनधिकृत बांधकामांना कोणताही दिलासा दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.