Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्र, देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर..
LIVE
Background
Maharashtra Breaking News Live Updates : राज्यात राजकीय घडामोडींसह अनेक घटना घडल्या आहेत. राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
Maharashtra Breaking News Live Updates : राज्यासह देशात राजकीय घडामोडींसह अनेक घटना घडत आहेत. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. तर राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
मरीनड्राईव्हच्या ट्रायडेन्ट हॉटेलमध्ये 60 वर्षीय महिलेचा मृतदेह;परिसरात खळबळ
मरीनड्राईव्हच्या ट्रायडेन्ट हॉटेलमध्ये 60 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे.
विनती मेहतानी असे या महिलेचे नाव असून रविवारची ही घटना आहे.
हाॅटेलच्या 27व्या माळ्यावर ही महिला खोलीत होती.
हाॅटेलचे कर्मचारी रुम सर्विससाठी गेल्यावर महिला दरवाजा उघडत नव्हती.
मास्टर चावीने खोलीचा दरवाजा उघडला असता. महिलेचा मृतदेह सापडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला पेडररोवरील चेलाराम हाऊस परिसरात रहाते
मृत महिला हाॅटेलमध्ये कधी आली होती त्याच बरोबर इतर माहिती पोलिस घेत आहेत
मृत महिला ही आजारी असल्याची माहिती मिळाली असून संशयास्पद काही आढळून आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली
या प्रकरणी मरीनड्राईव्ह पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलिस करत आहे
जालन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे
जालना: शहरातील भोकरदन नाका परिसरात मराठा कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले आहेत. मस्साजोग आणि परभणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अखिल मराठा महासंघाच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला आहे. अजितदादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, याचा आम्ही निषेध करतो. धनंजय मुंडे त्याच पक्षाचे मंत्री आहेत आणि त्याच पक्षाचे तिथे पालकमंत्री झाले. म्हणून आमचा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने याला विरोध आहे. अजित पवार यांनी स्वतः पालकमंत्री पद न घेता दुसऱ्या पक्षाच्या मंत्राला पालकमंत्री पद द्यायला हवं होतं. यासाठी आम्ही अजित दादांना आज काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केल्याची प्रतिक्रिया मराठा आंदोलन अरविंद देशमुख यांनी दिली आहे.
मेळघाटातील महिलेची धिंड काढणाऱ्या आरोपींना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
अमरावती: जादूटोना करण्याच्या कारणावरून वृद्ध महिलेसोबत झालेल्या अमानुष वागणुकीच्या संदर्भात अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि जिल्हाधिकारी सौरव कटियार यांनी पीडित महिलेच्या गावी रेट्टयाखेडा येथे भेट दिली. यावेळी पीडितेची आणि नातेवाईकांची विचारपूस केली. तसेच यावेळी त्यांनी वृद्ध महिलेकडून घडलेल्या घटनेची माहिती घेतली. या प्रकरणात गावातील पोलीस पाटील यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर भविष्यात गावामध्ये अशाप्रकारे प्रसंग घडू नये यासाठी प्रशासनातर्फे उद्या 21 जानेवारी रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. अशातच मेळघाटातील महिलेची धिंड काढणाऱ्या आरोपींना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये रेल्वेच्या जमिनीवर रेल्वे क्वार्टर्स उभारण्यास मंजुरी
मुंबई: अदानी समूहाकडून करण्यात येणाऱ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पांमध्ये रेल्वे मालकीच्या जमिनीवर रेल्वे क्वाटर्स बांधण्यासंबंधी मुंबई महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. या महिन्यातच या रेल्वे क्वार्टरच्या कामाला सुरुवात होणार असून पुढील दोन वर्षात हे क्वार्टर्स तयार होतील, असे सांगण्यात आले आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम आदानी समूहाला मिळाल्यानंतर एकीकडे धारावीमध्ये सर्वे सुरू असताना दुसरीकडे खऱ्या अर्थाने या परवानगी नंतर बांधकामाच्या कामाला सुरुवात होणार आहे. रेल्वे क्वार्टरच्या बांधकामामध्ये चार बहुमजली इमारतीचा समावेश असेल, रेल्वेला धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडून 1000 कोटी रुपये या जमीन हस्तांतराच्या वेळी देण्यात आले आहे.
Jalgaon Crime: लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला; सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता अन् चॉपरने वार करुन संपवलं
Jalgaon Crime: लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला; सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता अन् चॉपरने वार करुन संपवलं
पाच वर्षांपूर्वीच्या केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून
मुली कडच्यांनी भरदिवसा आपल्या जावयालाच कोयता आणि चॉपरने वार करत ठार केल्याची घटना
काल जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात घडली होती,
या घटनेने सैराट चित्रपटातील कथानकाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत
या घटनेत मुकेश रमेश शिरसाठ या प्रेमविवाहित तरुणाची हत्या झाली आहे,
तर त्याच्या कुटुंबातील सात जण जखमी झाले.
या घटनेत जळगावात सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याने मानले जात असून समाजमन सुन्न झाले आहे.