Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशासह राज्यातील क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Background
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशासह राज्यातील क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...
वैष्णवी हगवणे आत्महत्या (Vaishnavi Hagwane Case) प्रकरणात अटकेत असलेल्या हगवणे भावांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार असल्याचं दिसून येत आहे. शशांक हगवणे (Shashank Hagwane) आणि सुशील हगवणे (Sushil Hagwane) यांच्याकडील पिस्तूल परवाण्याची चौकशी पुणे पोलिसांकडून (Pune Police) सुरू असून पिस्तूल परवाण्याची चौकशीअंती धक्कादायक माहिती समोर आली आहे. हगवणे बंधुंनी चुकीचे पत्ते देऊन शस्त्र परवाना मिळवल्याबद्दल शशांक हगवणे याच्या विरोधात वारजे, तर सुशील हगवणे याच्या विरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरसीबीचा 8 विकेट्सनी पराभव
आयपीएल 2025 च्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर राहून थेट क्वालिफायर-1 मध्ये प्रवेश केलेल्या पंजाब किंग्स संघाला मोठा धक्का बसला आहे. प्लेऑफच्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून 8 विकेट्सने पराभव पत्करला आणि थेट अंतिम फेरी गाठण्याची सुवर्णसंधी गमावली. पण, या पराभवानंतरही पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने गर्जना करत असे काही म्हटले जे चर्चेचा विषय बनले आहे. सामना गमावल्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला की, पंजाब संघाने सामना हरला, पण युद्ध अजून बाकी आहे.
140 दिवस उलटूनही बुलढाणा केस आणि नख गळतीच्या रुग्णांचा अहवाल गुलदस्त्यात
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील अनेक गावात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक अजब प्रकार उघडकीस आला होता. या परिसरातील जवळपास 20 ते 22 गावातील नागरिकांना अचानक केस गळतीचा व टक्कल पडण्याचा त्रास सुरू झाला. "एबीपी माझा"ने सर्वात प्रथम ही बातमी उजेडात आणल्यानंतर आरोग्य प्रशासन खळबळून जागं झालं. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी तात्काळ देशातील सर्वोच्च संशोधन संस्था असलेल्या आयसीएमआरच्या (ICMR) पथकाला या परिसरात संशोधन करण्यासाठी पाठवलं. लाखो रुपये खर्च करून आयसीएमआरच पथक या परिसरात आलंही. त्यांनी रुग्णांचे नमुने ही घेतले. मात्र अद्यापही आयसीएमआरचा अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाही. यामुळे मात्र आयसीएमआर च पथक फक्त पर्यटनासाठी तर नाही आलं नव्हतं ना...? असा सवाल उपस्थित राहत आहे.
मोठी बातमी! चाळीस वर्षीय अपंग महिलेची साखळदंडातून कोल्हापूर पोलिसांनी केली सुटका
कोल्हापूर शहरातील सायबर चौक परिसरात राहणाऱ्या चाळीस वर्षीय अपंग महिलेला साखळदंडात डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आलाय...या महिलेला गेल्या महिनाभरापासून राहत्या घरातच साखळदंडात डांबून ठेवलं असून कोल्हापूर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजारामपुरी पोलिसांच्या संयुक्त कारवाई करत हा सगळा प्रकार उघडकीस आलाय. सारिका साळी असे 40 वर्षीय डांबून ठेवलेल्या अपंग महिलेचे नाव आहे. पोलिसांनी कुलपाची चावी बनवणाऱ्या व्यक्तीला बोलवून साखर दंडातून मुक्त केलं... दरम्यान तिची तब्येत बरी नसल्याने तिला उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे...तर याप्रकरणी पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे... दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उपनेते संजय पवार यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित महिलेच्या कुटुंबातील एका युवकाला मारण्याचा देखील प्रयत्न केल्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बंद होतं.























