Maharashtra Breaking LIVE Updates: दिल्लीत भूकंपाचे मोठे धक्के, 9 वाजून 4 मिनिटांनी जाणवले भूकंपाचे मोठे धक्के
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
LIVE

Background
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात...
नेहमी वादाच्या भोवऱ्यात असणारे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आता गुंडगिरीचा नमुना दाखवला. तोही थेट लोकप्रतिनिधींचं वास्तव्य असलेल्या आमदार निवासात... मात्र 30 तास उलटूनही अद्याप संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही... आकाशवाणी आमदार निवासातल्या कॅन्टिनमध्ये गायकवाडांना निकृष्ट जेवण मिळालं. त्यामुळे संतापलेल्या गायकवाडांनी थेट कॅन्टिन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. त्यांच्या राड्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उडवली. यावेळी ते चक्क बनियानवर होते, यावरही विरोधकांनी आक्षेप घेतला. हा सत्तेचा माज असल्याचा आरोप विरोधकांनी केला... खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली मात्र अद्याप गायकवाडांवर गुन्हा का दाखल झाला नाही असा सवाल उपस्थित होतोय...
पगारासह अन्य मागण्या सरकारकडून मान्य; शिक्षक आंदोलन मागे
ज्यांच्यावर पुढची पिढी घडवण्याची जबाबदारी आहे, अशा शिक्षकांनी पुकारलेल्या आंदोलनाची सांगता झालीय. पगारासह अन्य मागण्या सरकारने मान्य केल्याने शिक्षकांनी आंदोलन मागे घेतलं. शिक्षकांच्या या आंदोलनाला भेट देणाऱ्या विरोधी नेत्यांमुळे सत्ताधारी-विरोधक आरोप-प्रत्यारोपांची छडीही एकमेकांवर उगारण्यात आली...
मुलाकडून झालेला अपघात हे ड्रंक आणि ड्राईव्हचं प्रकरण नाही, भाजपचे आमदार सुरेश धस यांचा दावा
अहिल्यानगरमध्ये आमदारपुत्राच्या गाडीच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला... या प्रकरणात आमदार सुरेश धस यांच्या मुलावर कारवाई करण्यात आलीये. या अपघातावेळी सागर धस दारु पिऊन होता का? याचा तपास सुरु असतानाच आमदार सुरेश धसांनी मात्र अपघातात ड्रिंक अँड ड्राईव्हची कोणतीही शक्यता नसल्याचं छातीठोकपणे सांगितलंय... आपल्या मुलाला कोणतंही व्यसन नसल्याचं धसांचं म्हणणं आहे.
Yavatmal Crime: पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून निर्घुण हत्या
Yavatmal Crime: कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून निर्घुण हत्या केली. ही गंभीर घटना यवतमाळ शहरातील वाघापूर परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. इंद्रकला विजय जयस्वाल असे मृत महिलेचे नाव आहे. तर विजय जयस्वाल असे मारेकरी पतीचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून पती विजय हा पत्नीवर संशय घेत होता. यामुळे दोघांमध्ये नेहमी वादाचे खटके उडत होते. दरम्यान, पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने संतप्त झालेल्या विजयने पत्नी इंद्रकलाच्या डोक्यात सिलेंडर घातले. यात ती जागेवरच कोसळली. प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Bhandara Rains : भंडाऱ्यात अतिवृष्टीनंतर पावसाची उसंत, पूर ओसरायला सुरुवात
Bhandara Rains : भंडाऱ्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. वैनगंगा नदीच्या कारधा पुलावर पाणी आलं होतं. मात्र पावसाने उसंत घेतल्याने पूर ओसरायला सुरुवात झालीय. तसंच जिल्ह्यातील अनेक बंद असलेले मार्गही आता हळूहळू सुरू होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती आता पूर्वपदावर येत आहे.























