Beed News : बीडच्या फातेमाने लिहिलं नरेंद्र मोदींना उर्दू भाषेत पत्र, 'धन्यवाद मोदीजी' म्हणत लिहिते...
Beed News : बीडच्या फातेमाने 'धन्यवाद मोदीजी' म्हणत उर्दू भाषेतून पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. काय म्हटलंय पत्रात?
Beed News : केंद्र सरकारच्या विविध योजना आणि त्याचा सर्वसामान्य लोकांना झालेला फायदा या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त भारतामध्ये 'धन्यवाद मोदीजी' हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. बीडच्या (Beed) आष्टीमध्ये देखील याच अभियानाचा एक भाग म्हणून शहरातील सय्यद नाज फातेमा या मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उर्दू भाषेतून पत्र लिहिलं आहे. 'धन्यवाद मोदीजी' म्हणत तिने हे पत्र पंतप्रधानांना लिहिले आहे. काय म्हटलंय पत्रात?
उर्दू भाषेत पत्र लिहून मोदींना धन्यवाद
भाजपचे आमदार सुरेशदास यांच्या नेतृत्वाखाली आष्टी पाटोदा आणि शिरूर मतदारसंघांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे.. नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याणकारी योजनांचा देशातील अनेक नागरिकांना फायदा झाला आहे. त्यामुळे सय्यद नाज सय्यद फतेमा हिने आष्टी मतदार संघामध्ये नरेंद्र मोदी यांच्या योजनेमुळे लोकांना जो फायदा झाला आहे, त्याबद्दल उर्दू भाषेत पत्र लिहून नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद मोदीजी म्हणत आभार मानले आहेत..