(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Assembly Speaker Election : विधानसभा अध्यक्षांची भूमिका एका न्यायमूर्तीसारखी - देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे नातं सासरे आणि जावयाचं आहे. हा एक योगायोग आहे.
Maharashtra Assembly Speaker Election : विधानसभा अध्यक्षांची भूमिका एका न्यायमूर्तीसारखी असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. राहुल नार्वेकर हे देशातील तरुण विधानसभा अध्यक्ष असून त्यांचं अभिनंदन.. याआधीच्या अध्यक्षांनी देखील उत्तमरित्या काम केलंय.
हे नातं सासरे आणि जावयाचं..
वरच्या सभागृहाचे सभापती आणि खालचे अध्यक्ष, हे नातं सासरे आणि जावयाचं आहे. हा एक योगायोग आहे. पण पुलं म्हणतात, जावई आणि सासऱ्याचं एकमत होणं कठीण आहे. जावयाचा उल्लेख असा करतात, की जावई म्हणजे सासऱ्याच्या पत्रिकेतला दशम ग्रह आहे. त्यांचं प्रेम आहे सासऱ्यावर असंही फडणवीस यांनी अभिनंदन ठराव करताना केला.
विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकरांची निवड
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. आता महाराष्ट्राच्या विधिमंडळात सासरे आणि जावयांचं 'राज्य' असणार आहे. कारण विधानसभा आणि विधानपरिषद या दोन सभागृहाच्या 'चाव्या' आता सासरे आणि जावयाच्या हाती आल्या आहेत. विधानसभेत जावई राहुल नार्वेकर तर विधानपरिषदेत त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत.
अध्यक्षांची भूमिका आता महत्वाची
नार्वेकर ते राज्याच्या आणि देशाच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. ते राज्य विधानसभेचे 20 वे अध्यक्ष आहेत. आज झालेल्या विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त 164 मतं मिळाली. तर राजन साळवी यांना 107 मतं मिळाली. समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. एकूण तीन आमदार तटस्थ राहिले. अशा पद्धतीनं नार्वेकर मोठ्या मतांनी विजयी झाले. आता अध्यक्षांची भूमिका आता महत्वाची असणार आहे.
विधानमंडळावर सासरे आणि जावयांचं 'राज्य'