एक्स्प्लोर

Maharashtra Big Fights : महाराष्ट्राची सत्ता कुणाकडे हे ठरवणार 'या' बिग फाईट्स, अशा रंगल्या हाय व्होल्टेज लढती

Maharashtra Big Fights List : बारामती, कागल, कोल्हापूर उत्तर, वरळी, माहीम, ठाणे अशा अनेक ठिकाणच्या लढतींकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. 23 नोव्हेंबर रोजी कोण मैदान मारतंय हे स्पष्ट होईल.

मुंबई  : राज्यामध्ये मतदानाची प्रक्रिया तर पार पडली, आता सर्वाचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी मतदारांचा कल नेमका कुणाला मिळतोय याकडे. तुरळक अपवाद वगळता राज्यातील मतदान हे शांततेत पार पडलं. पण राज्यातल्या काही भागात हायव्होल्टेज लढती पाहायला मिळाल्या. त्याच्या चर्चाही संपूर्ण निवडणूक होईपर्यंत रंगल्या होत्या. अनेकजण याबद्दल अंदाज व्यक्त करत होते. पण दिवसेंदिवस त्यांच्या अंदाजातही बदल होताना पाहायला मिळत होता. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या बिग फाईट्स कोणत्या होत्या यावर एक नजर टाकूयात, 

मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

कोपरी पाचपाखाडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे केदार दिघे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्यात आणखी एक महत्त्वाची बिग फाईट आहे ती म्हणजे माहिम विधानसभा मतदारसंघाची. कारण तिथे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर ठाकरेंचे महेश सावंतही याच मतदारसंघातले उमेदवार आहेत. 

अशीच एक तिहेरी लढत वरळीतही पहायला मिळाली. वरळीत शिंदे गटाचे मिलिंद देवरा, ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आणि मनसेचे संदीप देशपांडे आपलं नशीब आजमावताहेत. दुसरीकडे वांद्रे पूर्वमध्ये झिशान सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाई अशी लढत रंगल्याचं दिसून आलं. 

ठाण्यातही  तिहेरी लढत पहायला मिळाली. शिंदे गटाचे संजय केळकर विरुद्ध ठाकरे गटाचे राजन विचारे आणि मनसेच्या अविनाश जाधव यांच्यात ही लढत पार पडली. तर तिकडे कोकणात कुडाळमध्ये निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक असा थेट सामना रंगला.  

बारामती, कागलच्या लढतीकडे राज्याचं लक्ष

पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी बिग फाईट म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघ. बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी काका-पुतण्यांची थेट लढत पाहायला मिळाली. या दोन्ही नेत्यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. मावळमध्ये सुनिल शेळके विरुद्ध बापू भेगडे अशी लढत झाली. दोघांनीही मतदानानंतर विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. 

यानंतर सगळ्यात जास्त हाय व्हॉल्टेज लढत होती ती कागल विधानसभा मतदारसंघातली. कारण कागलमध्ये दोन कट्टर विरोधक आमने-सामने आहेत. राष्ट्रवादीतून हसन मुश्रीफ तर शरद पवारांच्या पक्षाकडून समरजीत घाटगेंना उमेदवारी देण्यात आली होती. या मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 81 टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याची माहिती आहे.

'कोल्हापूर उत्तर'चं काय?

कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ यावेळी चांगलाच चर्चेत आला. ऐनवेळी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी माघार घेतल्यानंतर या ठिकाणी काँग्रेसने अपक्ष राजू लाटकरांना पाठिंबा दिला. सतेज पाटील यांनी त्यांच्यामागे संपूर्ण ताकद लावली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच फिल्डिंग लावल्याचं दिसून आलं.  

सांगोल्यात कुणाची बाजी

सांगोल्यातही एक मोठी लढत पाहायला मिळाली. ती म्हणजे 'काय झाडी काय डोंगार' फेम शिवसेनेचे शहाजीबापू पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे दीपक साळुंखे यांच्यात. या लढतीत कोण बाजी मारणार हेही पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

आणखी एक महत्त्वाची बिग फाईट म्हणजे सांगलीच्या कवठेमहांकाळ विधानसमभा मतदारसंघातली. संजयकाका पाटील विरुद्ध रोहित पाटील अशी थेट लढत या निवडणुकीत रंगली. ही निवडणूक आता जनतेनं हातात घेतलीय अशी प्रतिक्रिया या दोन्ही नेत्यांनी यावेळी दिली. 

कर्जत जामखेडची हाय व्होल्टेज लढत

आता आणखी एका लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं ती म्हणजे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाकडे. रोहित पवार विरुद्ध राम शिंदे यांच्यात ही थेट लढत झाली.  तर तिकडे जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेनेच्या गुलाबराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर असा सामना बघायला मिळाला. 

नांदगावमध्ये राडा

नांदगावमध्ये सुहास कांदे विरुद्ध गणेश धात्रक विरुद्ध समीर भुजबळ अशी तिहेरी लढत पाहायला मिळाली या मतदारसंघात हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. तुझा मर्डर फिक्स आहे अशी थेट धमकीच शिंदेंच्या सुहास कांदेंनी समीर भुजबळांना दिल्याचं दिसून आलं. 

मराठवाड्यात परांडा विधानसभेत तानाजी सावंत विरुद्ध राहुल मोटे अशी लढत पहायला मिळतेय. तर यावेळी सर्वाधिक चर्चेत आलेल्या बार्शी मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेल्या राजेंद्र राऊत यांच्यासमोर ठाकरे गटाच्या दिलीप सोपल यांचं आव्हान आहे. 

विदर्भातील रामटेकमध्ये आशिष जैस्वाल विरुद्ध विशाल बरबटे यांच्यात सामना रंगणार आहे. विदर्भात आणखी एक महत्त्वाची लढत म्हणजे सावनेर विधानसभा मतदारसंघातली. कारण इथे आशिष देशमुखांविरोधात अनुजा केदार असा सामना रंगणार आहे. 

Maharashtra Bigg Fights List : इतर महत्त्वाच्या बिग फाईट्स

जळगाव ग्रामीण- गुलाबराव पाटील वि. गुलाबराव देवकर
मुक्ताईनगर - चंद्रकांत पाटील वि. रोहिणी खडसे
मालेगावर बाह्य- दादा भुसे वि. अद्वय हिरे
येवला - छगन भुजबळ वि. माणिकराव शिंदे

राजापूर - किरम सामंत वि. राजन साळवी
कुडाळ - निलेश राणे वि. वैभव नाईक
सावंतवाडी - दीपक केसरकर वि. राजन तेली
कणकवली - नितेश राणे वि. संदेश पारकर

बेलापूर- मंदा म्हात्रे वि. संदीप नाईक
ऐरोली - गणेश नाईक वि. एम के मढवी वि. विजय चौगुले
मिरा भायंदर - नरेंद्र मेहता वि. गीता जैन

इंदापूर - दत्ता भरणे वि. हर्षवर्धन पाटील
आंबेगाव - दिलीप वळसे पाटील वि. देवदत्त निकम
कोल्हापूर दक्षिण- अमल महाडिक वि. ऋतुराज पाटील
पंढरपूर - समाधान औताडे वि. भगिरथ भालके

लातूर- अर्चना पाटील चाकूरकर वि. अमित देशमुख
जालना - अर्जुन खोतक वि. कैलास गोरंट्याल
भोकरदन - संतोष दानवे वि. चंद्रकांत दानवे
कन्नड - संजना जाधव वि. हर्षवर्धन जाधव

परळी - धनंजय मुंडे वि. राजेसाहेब देशमुख

दिंडोशी - संजय निरुपम वि. सुनिल प्रभू
मानखूर्द-शिवाजीनगर - नबाव मलिक वि. अबु आझमी
शिवडी - बाळा नांदगावकर वि. अजय चौधरी
मुंबादेवी - शायना एनसी वि. अमिन पटेल
अणुशक्तिनगर - सना मलिक वि. फहाद अहमद

दिग्रस- संजय राठोड वि. माणिकराव ठाकरे

ही बातमी वाचा: 

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका सुरुच, नामांकित खासगी बँकेला दणका, तब्बल 62 लाखांचा दंड, कारण समोर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका सुरुच,नामांकित खासगी बँकेला दणका, तब्बल 62 लाखांचा दंड, कारण समोर

व्हिडीओ

T-20 WorldCup Team Announce : टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा, शुभमन गिलला वगळलं
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Mumbai BJP And Shivsena Seat Sharing : मुंबईत जागावाटपात भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच
Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका सुरुच, नामांकित खासगी बँकेला दणका, तब्बल 62 लाखांचा दंड, कारण समोर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका सुरुच,नामांकित खासगी बँकेला दणका, तब्बल 62 लाखांचा दंड, कारण समोर
Team India Squad Against New Zealand: रिंकू सिंग, इशान किशान IN, शुभमन गिल, जितेश शर्मा OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
रिंकू, इशान IN, शुभमन, जितेश OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
Kopargaon Nagarparishad Election 2025: कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
T20 World Cup: टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
Prithviraj Chavan: अभी तो पार्टी शुरु हुई है! पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 सनसनाटी दावे, हरदीप सिंग पुरी, मोदी ते अनिल अंबानींचा पहिल्यांदाच थेट उल्लेख करत काय काय म्हणाले?
अभी तो पार्टी शुरु हुई है! पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 सनसनाटी दावे, हरदीप सिंग पुरी, मोदी ते अनिल अंबानींचा पहिल्यांदाच थेट उल्लेख करत काय काय म्हणाले?
Embed widget