एक्स्प्लोर

Maharashtra Budget Session Live 2023 : अर्थसंकल्पीय अधिवेशनचा आज शेवटचा दिवस

Maharashtra assembly budget session 2023  : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनचा आज शेवटचा दिवस आहे.

LIVE

Key Events
Maharashtra Budget Session Live 2023 : अर्थसंकल्पीय अधिवेशनचा आज शेवटचा दिवस

Background

Maharashtra Budget Session : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session) आज (25 मार्च) शेवटचा दिवस आहे. आजही विरोधक विविध मुद्यावरुन आक्रमक होण्याची शक्यता आहे.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session) शेवटचा आठवडा सुरु आहे. येत्या 25 तारखेला म्हणजे शुक्रवारी अधिवेशचा शेवटचा दिवस असणार आहे. दरम्यान, विविध मुद्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सभागृहात धारेवर धरले आहे. आजही शेतकरी प्रश्नांसह इतर मुद्यावरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच आज विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव देखील येणार आहे.

मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या विरोधात समाजवादी पार्टीचे आमदार आंदोलन करणार

अवकाळीमुळं राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची उभं पिकं वाया गेली आहेत. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या झालेल्या नुकसानाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना लगेच आर्थिक मदत मिळावी यासाठी आजही विरोधक सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, समाजवादी पार्टीच्या आमदारांनी मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मंत्री लोढा यांनी सभागृहात लव्ह जिहादबद्दल चुकीची माहिती दिली असल्याचा आरोप करत सपा आमदार आज आंदोलन करणार आहेत.

राज्यातील कायदा, सुव्यवस्थेबाबत चर्चा होणार

दरम्यान, आज विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव येणार आहे. यावेळी राज्यातील कायदा, सुव्यवस्था यावरती विधानसभेत चर्चा होणार आहे. तसेच राज्याच्या अनेक ठिकाणी झालेल्या हिंसेच्या घटना, बलात्काराच्या घटना, लोकप्रतिनिधींना आलेल्या धमक्या या सगळ्या मुद्द्यांवरत विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे.

अवकाळी पावसाचा मोठा फटका

अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाला आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची (Farmers) चिंता वाढली आहे. यासंदर्भात विधानसभेत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनचा चौथा आठवडा सुरु आहे. अधिवेशन सुरु झाल्यापासून विविध प्रश्नांवरुन विरोधक विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन करत आहेत. तसेच सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत.

12:38 PM (IST)  •  25 Mar 2023

सांगली जिल्हा बॅक भ्रष्टाचार प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होणार : सहकार मंत्री अतुल सावे

सांगली जिल्हा बॅक भ्रष्टाचार प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी केली जाणार, विधानसभेत सहकार मंत्री अतुल सावे यांची घोषणा  

सांगली जिलंहा बॅंके प्रकरणात २०२१ साली चौकशी आदेश सहकार विभागाने दिले पण अद्साप काहीच झाले नाही यावरून विधानसभेत संजय सावकारे, राम सातपुते, हरीभाऊ बागडे यांनी आक्रमक भूमिका धेतली. 

या जिल्हा बॅंक चौकशी प्रकरणामुळ् काॅग्रेस एनसीपी नेत्यांची अडचण वाढणार

12:37 PM (IST)  •  25 Mar 2023

 नॅक मुल्यांकन न घेतलेल्या महाविद्यालयांवर कारवाई होणार

 नॅक मुल्यांकन न घेतलेल्या महाविद्यालयांवर होणार कारवाई 

- राज्य सरकारने केले स्पष्ट 

- तारांकित प्रश्नावर दिले राज्य सरकारने लेखी उत्तर 

- राज्यातील ३ हजार ३४६ वरीष्ठ महाविद्यालयांपैकी फक्त १ हजार ९७३ वरीष्ठ महाविद्यालयांनी नॅक मुल्यांकन प्राप्त केले आहे

- मुंबई आणि पनवेल मधील ६६८ पैकी फक्त २७३ महाविद्यालयांनी नॅक मुल्यांकन प्राप्त केले आहेत

- सर्वांत कमी नॅक मुल्यांकन प्राप्त महाविदयालय मुंबई आणि पनवेल मध्ये 

- नॅक मुल्यांकन प्राप्त न केल्यास अनुदान, संलग्नता मंजूर करण्यात येणार नाही

12:32 PM (IST)  •  25 Mar 2023

विधिमंडळात राहुल गांधी यांच्या पोस्टर संदर्भात जे काही झालं त्याबाबत आजच निर्णय घ्यावा : अशोक चव्हाण

Maharashtra Budget Session 2023 :  विधिमंडळात राहुल गांधी यांच्या पोस्टर संदर्भात जे काही झालं त्याचा निर्णय तुम्ही आज देण्यात यावा, अशी विनंती काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्षांना केली.  यावर विधानसभा अध्यक्ष म्हणाले की, विधिमंडळात जे काही घडलेला आहे त्या संदर्भात उपसभापती यांच्याशी चर्चा करून मी अंतिम निर्णय घेईल. कारण विधिमंडळातील हा महत्त्वाचा निर्णय आहे. त्यामुळं त्यांनाही विश्वासात घ्यावं लागेल.
-

12:09 PM (IST)  •  25 Mar 2023

Ajit Pawar : राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारणाऱ्यांवर कारवाई करा, विरोधकांची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रीय नेते काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या प्रतिमेला विधीमंडळ परिसरात सत्ताधारी पक्षाच्या काही आमदारांनी जोडे मारल्याची घटना घडली. ज्यांनी अशी कृती केली त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. राष्ट्रीय नेत्याच्या प्रतिमेला असे जोडे मारणे योग्य नसल्याचे अजित पवार म्हणाले. तर आमच्याकडेही जोडे असल्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले. या घटनेचा आम्ही निषेध करत असल्याचे थोरात म्हणाले.   

11:12 AM (IST)  •  25 Mar 2023

गेल्या सात वर्षापासून विरोधकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न : रविंद्र धंगेकर

Maharashtra Budget Session 2023 :  गेल्या सात वर्षापासून विरोधकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्रीय यंत्रणेत भाजपचा हस्तक्षेप पाहायला मिळत आहे. पंतप्रधान इतर भाजप नेते हे लोकशाही हुकुमशाहीकडे नेत  काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले. लोकशाहीच्या चारही स्तंभावर दबाव टाकला जात आहे. राहुल गांधी कधीच माफी मागू शकत नाहीत असेही दंगेकर म्हणाले.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोपSSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Embed widget