एक्स्प्लोर

उपासमारीची वेळ आली म्हणत कलाकार उतरले रस्त्यावर, राज्यभर रंगकर्मींचं विविध मागण्यांसाठी आंदोलन

आज राज्यभरात रंगकर्मींचा आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं.  मुंबईत परिसरातील दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्यासमोर आज रंगकर्मींनी आंदोलन केलं.

मुंबई : राज्यभरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधाना शिथिलता मिळाली आहे. पण दुसरीकडं मात्र सांस्कृतिक कार्यक्रमांवर अजूनही बंदी आहे. आज राज्यभरात रंगकर्मींचा आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं.  मुंबईत परिसरातील दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्यासमोर आज रंगकर्मींनी आंदोलन केलं.  गेल्या सोळा महिन्यापासून नाट्यगृह व इतर सर्व कार्यक्रम बंद असल्याने घर कसं चालवायचं ? असा प्रश्न नाट्यकलावंत समोर आहे.  या आंदोलनात कलाकारांसोबत तंत्रज्ञ व नाट्यगृह त्याचं घर चालतं, असे सर्वच जण यामध्ये सहभागी झाले आहेत. लोककलावंतांनी जागर रंगकर्मींचा हा कार्यक्रम सादर करून आपल्या मागण्या सरकार समोर मांडले आहेत.  त्यामुळे सरकारने कलाकारांना मदत मिळवून देऊन नाट्यग्रह लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी रंगकर्मींकडून केली जात आहे.

 समाजातील प्रत्येक घटकाला निर्बंध मधून सूट मिळाली आहे मात्र नाट्यगृह आणि सिनेमागृह अजूनही बंद आहेत. कलाक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अजूनही नीट बंदमधून सूट मिळालेली नाही. त्यामुळे नाट्य आणि सिनेसृष्टीतील कलाकारांसोबत लोक कलाकार देखील मोठ्या संकटात सापडले आहेत. यात सर्व कलाकारांनी आज राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. नाट्यगृह आणि सिनेमा गृह चालू करा, कलाकार बोर्डाची स्थापना करा, मानधनात वाढ करा, कायमस्वरूपी पेन्शन योजना सुरू करा अशा अनेक मागण्या करत आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील अनेक कलावंतांनी आंदोलन केले.

राज्यभरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधाना शिथिलता मिळाली आहे. पण दुसरीकडं मात्र सांस्कृतिक कार्यक्रमांवर अजूनही बंदी आहे. यामुळं रंगकर्मींनी सोमवारी नागपुरच्या संविधान चौकात पथनाट्य करत व्यथा मांडल्या. शासनाची भीक नको फक्त सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्या अशी मागणी करण्यात आली. 

यावेळी लक्ष वेधून घेण्यासाठी कलाकारांनी सहभाग घेतला. कुणी गाण्यातून तर काहींनी पथनाट्य, काहींनी वेशभूषा सावरून लक्ष वेधलं. सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्यानं उपासमारीची वेळ आल्याचं रंगकर्मींनी सांगितलंय. राज्य सरकारची मदत नको फक्त कार्यक्रमांना परवानगी द्या, आम्ही सक्षम आहो आमचा उदरनिर्वाह करण्यासाठी असे रंगकर्मी आंदोलनाचे संयोजक संजय भाकरे म्हणाले. 

 कोरोनाची सुरूवात आम्ही कलाकारांनी केली की काय?
मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा संदर्भ देत दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की,  दोन डोस घेतलेल्यांना ट्रेन प्रवास सुरू होणार पण सिनेमागृह नाट्यगृह याविषयी एक चकार शब्द नाही... या कोरोनाची सुरूवात आम्ही कलाकारांनी केली की काय? असं वाटू लागलं आहे.. आमचे कोणीच वाली नाही.. आमच्या वाट्याला सगळे सुग्रीवच, असं शिंदे यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget