Maharashtra Headlines 21st June : दुपारच्या बातम्यांमध्ये वाचा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
मुंबईतील लोअर परेलमध्ये ट्रेड वर्ल्ड इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली, नऊ जण जखमी
मुंबईतील लोअर परेलमध्ये लिफ्ट कोसळल्याची घटना घडली. सेनापती बापट मार्ग कमला मिल इथल्या ट्रेड वर्ल्ड इथे ही दुर्घटना घडली. सोळा मजल्याच्या या इमारतीमध्ये चौथ्या माळ्यावरुन ही लिफ्ट खाली कोसळल्याची माहिती आहे. यामध्ये नऊ जण जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या ग्लोबल आणि केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींची प्रकृती स्थिर असून कोणीही गंभीर जखमी नसल्याची माहिती आहे. वाचा सविस्तर
BMC कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीची छापेमारी; सुजीत पाटकर यांच्या मालमत्तांवरही छापा
बीएमसी कोविड घोटाळ्यासंबंधित मुंबईत ईडीकडून छापेमारी सुरू आहे. तब्बल 15 हून अधिक ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरु आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याशी संबंधित तब्बल 10 ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरु आहे. कोरोना काळात लाईफलाईन कंपनीच्या घोटाळा प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाशी संदर्भात ईडीकडून छापेमारी सुरु आहे. वाचा सविस्तर
वारकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा, वारकऱ्यांना आता सरकारतर्फे विमा संरक्षण
राज्यातील लाखो वारकऱ्यांना सरकारने दिलासा दिला आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या 30 दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबवण्यात येईल. वाचा सविस्तर
छत्रपती संभाजीनगरमध्ये धार्मिक कार्यक्रमाच्या जेवणातून विषबाधा, 16 जणांवर उपचार सुरु
त्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील मांजरी हद्दीतील कान्होबावाडी गावात धार्मिक कार्यक्रमाच्या जेवणातून विषबाधा झाला असल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दुपारी तयार करण्यात आलेलं जेवण रात्री पुन्हा काह्ण्यात आल्याने ही विषबाधा झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या घटनेत विषबाधा झालेल्या एकूण 16 लोकांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर
नाशिकच्या बाजारात कोथिंबीरीला आज 100 ते 110 रुपयांचा भाव, इतर भाज्यांचे दर काय?
पावसाचे अद्याप आगमन झाले नसल्याने नाशिकमध्ये एकीकडे धरणांनी तळ गाठला आहे. तर दुसरीकडे पालेभाज्यांच्या भावात मोठी वाढ झालेली आहे. गेल्या महिन्यात कोथिंबीर जुडी 4 ते 5 रुपये दराने विकली जात होती, त्याच कोथिंबीरीला आज 100 ते 110 रुपयांचा भाव आला आहे तर कोथिंबिरीसोबतच मेथी, शेपू, पालक या पालेभाज्यांचे देखील दर जवळपास 50 टक्यांनी वाढले आहेत. वाचा सविस्तर