एक्स्प्लोर

Ashadhi Wari 2023 : वारकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा, वारकऱ्यांना आता सरकारतर्फे विमा संरक्षण

Ashadhi Wari 2023 : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Ashadhi Wari 2023 : राज्यातील लाखो वारकऱ्यांना (Warkari) सरकारने दिलासा दिला आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीत (Ashadhi Wari) सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या 30 दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल.  याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबवण्यात येईल. 

यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास एक लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास 50 हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी 35 हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. 

वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी हा या योजनेमागचा उद्देश आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करताना सांगितले.

विठुरायाच्या दर्शनाचा वेळ 7 ते 8 तासांनी कमी होणार, जिल्हाधिकाऱ्यांचा दावा

यंदा प्रथमच दर्शन रांगेत प्रत्येक 50 मीटरवर दर्शन रांग वेगाने पुढे नेण्यासाठी निरीक्षक नेमण्याची योजना जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी आणली आहे. त्यामुळे आता यात्रा कालावधीत दर्शनाचा वेळ 7 ते 8 तासांनी कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरु केला आहे. यामुळे यात्रा कालावधीत 30 -30 तास दर्शन रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना यामुळे मोठा दिलासा मिळू शकणार आहे. विठुरायाची दर्शन रांग विठ्ठल मंदिरापासून जवळपास 7 ते 8 किलोमीटर लांब जात असते. यातच दर्शन रांगेत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असल्याने भाविकांच्या दर्शनाचा वेळ लांबतंच जात असतो. याचा फटका वृद्ध भाविक महिला आणि लहान मुलांना बसत असतो. 

यावर्षी संपूर्ण दर्शन रांगेत दार 50 मीटरवर निरीक्षक नेमून त्यांना बिनतारी यंत्रणा दिली जाणार आहे. एखाद्या ठिकाणी काही गडबड दिसून आल्यास तातडीने तिथे सुरक्षेतील टीम पोचून घुसखोरी रोखेल. या व्यवस्थेमुळे दर्शनाची रांग न थांबता वेगाने पुढे पुढे जात राहिल आणि यामुळे दर्शन रांगेतील जवळपास 7 ते 8 तसंच वेळ कमी केला जाणार आहे. याशिवाय पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेनंतर कोणत्याच व्हीआयपीला दर्शन मिळणार नसल्याने घुसखोरी करणाऱ्या व्हीआयपीन पूर्णपणे पायबंद बसणार आहे. याचा फायदाही दर्शनाचा वेळ कमी होण्यात होणार आहे. यंदा पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या यंत्रणा राबविली जाणार असून ज्यामुळे दर्शन रांगेतील भाविकांना वेगाने दर्शन घेता येणार असल्याचे जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी सांगितले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक

व्हिडीओ

Vijay Sethupathi Majha Katta : 96 चा हिरो, साऊथचा सुपरस्टार, विजय सेतूपतीची माझा कट्टावर मोठी घोषणा
Burkha in Local Train : मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर Special Report
ZP Election Election : जिंकली लोकशाही, आजी नववधूच्या बोटाला शाई Special Report
Zp Election Voting Politics : मतदानाचा 'पोर'खेळ, लोकशाहीचा खेळ? Special Report
Pawar Family Together : पार्थ पवार- शरद पवारांचे एकत्र फोटो पाहून राजकीय चर्चेला उधाण Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
Embed widget