एक्स्प्लोर

Suresh Dhas: धनंजय मुंडेंच्या मागे हात धुऊन लागलेल्या सुरेश धसांना अजित पवारांनी भेट नाकारली?

Suresh Dhas: आमदार सुरेश धस यांना भेटणं बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी टाळलं का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. अजित पवार यांची भेट न घेताच सुरेश धस बीडला रवाना झाल्याची माहिती आहे.

पुणे: बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणानंतर भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सातत्याने त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्याचं दिसून आलं, मात्र आता सुरेश धस (Suresh Dhas)  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांची भेट घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांच्या 2019 ते 2024 पर्यंतच्या जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी करणार होते. मात्र, धस यांना अजित पवारांकडून भेटीसाठी वेळ न मिळाल्याने आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांना भेटणं बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी टाळलं का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. अजित पवार यांची भेट न घेताच सुरेश धस बीडला रवाना झाल्याची माहिती आहे.

अजित पवार यांची भेट घेऊन आज सुरेश धस 2019 पासून ते 2024 पर्यंतच्या जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करा अशी मागणी करणार होते. सुत्रांच्या माहितीनुसार अजित पवारांची वेळ न मिळाल्याने सुरेश धस बीडला निघून गेले आहेत. सध्या अजित पवार यांनी चौकशी समितीला केवळ2023-2024 या आर्थिक वर्षाची जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सुरेश धस यांचं म्हणणं आहे, धनंजय मुंडे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार जिल्हा नियोजन विभागाच्या कामात बीडमध्ये झाला आहे. धस यांच्या वतीने आधीच 72 कोटी रुपयांची बोगस बिले पुरावा म्हणून अजित पवारांना देण्यात आली आहेत. 

धस यांना भेटणं अजित पवारांनी टाळालं?

आमदार सुरेश धस यांना भेटणं अजित पवारांनी टाळालं का असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजित पवार यांची वेळ न मिळाल्याने सुरेश धस बीडकडे रवाना झाले आहेत. आज अजित पवार यांची भेट घेऊन आमदार सुरेश धस 2019 ते 2024 पर्यंतच्या जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करा अशी मागणी करणार होते. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अजित पवार यांची वेळ मागितली होती. मात्र, अजित पवार यांनी धस यांना भेटीसाठी वेळ दिली नाही, त्यामुळे धस बीडकडे रवाना झाले आहेत. सुरेश धस अजित पवार यांना भेटून 2019 ते 2024 पर्यंतच्या जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी करणार होते. 

जेव्हापासून धनंजय मुंडे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री झाले होते, तेव्हापासून म्हणजेच 2019 ते 2023 या काळामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या काळातील कामांची चौकशी होणे गरजेचे आहे, त्यामुळे अजित पवार यांना स्वतः भेटून पत्र देऊन या संदर्भातली चौकशी करण्याची मागणी ते करणार होते. मात्र अजित पवार यांच्या वतीने सुरेश धस यांना भेटीसाठी वेळ मिळालेली नाही.

या संपूर्ण प्रकरणांमध्ये पुरावा म्हणून सुरेश धस यांनी याआधीच 72 कोटी रुपयांची बिल दिली आहेत, कशा पद्धतीने 72 कोटी रुपये लाटले गेले याचे पुरावे देखील त्यांनी अजित पवार यांच्याकडे सादर केलेले आहेत. या संपूर्ण प्रकरणात लवकरात लवकर चौकशी व्हावी अशी मागणी सुरेश धस यांनी केलेली आहे. मात्र अजित पवारांनी त्यांच्या भेटीची वेळ टाळली असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. 2019 ते 2023 या काळातील चौकशीसाठी अजित पवार अनुमती देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, सुरेश धस या संपूर्ण प्रकरणात काय भूमिका घेतात हे देखील लवकरच स्पष्ट होईल.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget