एक्स्प्लोर

मनसे, वंचितनंतर आता आणखी एक पक्ष स्वबळावर लढणार, महायुतीतील घटक पक्षाची 288 जागांवर लढण्याची तयारी पूर्ण

Akola News : महायुतीचा निर्णय होईल त्यावेळी होईल, सध्यातरी आपण 288 जागांवर लढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती रासपचे अध्यक्ष आणि आमदार महादेव जानकर यांनी दिली. 

अकोला : मनसे, वंचित नंतर आता राज्यातील महायुतीतील एक पक्ष स्वबळावर लढण्याची चाचणी करतोय. महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षानं राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातही चाचपणी सुरू केली आहे. महायुतीचा घटक असलो तरी स्वबळावर लढण्यासाठी तयारी पूर्ण झाल्याची माहिती महादेव जानकर यांनी दिली. ते अकोल्यात माध्यमांशी संवाद साधत होते.

महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा 21 वा वर्धापन दिन सोहळा गुरूवारी अकोल्यात साजरा होत आहे. त्या दृष्टीने जानकर यांनी स्वबळाच्या दृष्टीने केलेल्या वक्तव्याला आता राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीने संसदीय मंडळाला स्वबळावर लढण्याची शिफारस केली तर पक्ष त्या निर्णयासोबत असेल असं जानकर म्हणाले.

वंचित लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निवडणूक लढवणार

राज्यातील जे वंचित आणि उपेक्षित लोक आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपला पक्ष निवडणूक लढवत असल्याचं महादेव जानकर म्हणाले.  ते म्हणाले की, 
राजकारणाच्या माध्यमातून उपेक्षित लोकांना अपेक्षित ठिकाणी घेऊन जाणार आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करणारा आमचा पक्ष आहे. गरीब लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार. तसेच वंचित समाजाला संधी देण्यासाठी काम करणार. 

विधानसभेच्या 288 जागांवर निवडणूक लढण्याचा निर्णय जर रासपच्या राज्य कार्यकारिणीने घेतला तर सगळ्या जागा लढवून असं महादेव जानकर म्हणाले. महायुतीमधून निवडणूक लढवायची असेल तर त्या संदर्भात युतीचा निर्णय नंतर घेतला जाईल. पण सध्या तरी 288 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती महादेव जानकर यांनी दिली.

महादेव जानकर-अमोल मिटकरी भेट

दरम्यान, महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची त्यांच्या न्यू तोष्णीवाला भागातील निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास बंददाराआड चर्चा झाली. 

50 जागा द्या अन्यथा...

या आधीही महादेव जानकरांनी महायुतीकडून 50 जागांची मागणी केली होती. राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीमध्येच आहे, महायुतीने सन्मानजनक जागा द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली. महायुतीत राष्ट्रीय समाज पक्षाला 50 जागा मिळाव्यात अन्यथा महाराष्ट्रात 288 जागा लढवणार असा इशारा महादेव जानकर यांनी दिली होता. शिवाय त्यांनी मुंबईतील गोवंडी आणि मागाठाणे या मतदारसंघांवर त्यांनी दावा ठोकलाय. विशेष म्हणजे सध्या मागठाणे विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे आमदार आहेत.

ही बातमी वाचा: 

 

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय; अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनी पदाच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी
Maharashtra Live blog updates: महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय; अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनी पदाच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी
Kolhapur CPR : सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
कोल्हापुरातील सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
Ashok Kharat Crime: ईशान्येश्वर मंदिरातील पुजाऱ्यासह बनावट अंगठ्या पुरवणाऱ्या सराफ व्यवसायिकाची भोंदू खरात समक्ष चौकशी, धक्कादायक माहिती आली समोर
ईशान्येश्वर मंदिरातील पुजाऱ्यासह बनावट अंगठ्या पुरवणाऱ्या सराफ व्यवसायिकाची भोंदू खरात समक्ष चौकशी, धक्कादायक माहिती आली समोर
Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय; अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनी पदाच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी
Maharashtra Live blog updates: महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय; अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनी पदाच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी
Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Stock Market : शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
Donald Trump : चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
Embed widget