Maha Vikas Aghadi : मराठवाड्यात महाविकास आघाडीत कोणता मतदारसंघ कुणाकडे अन् कोण असणार उमेदवार?, पाहा संपूर्ण यादी!
Maha Vikas Aghadi Seat Sharing : मराठवाड्यातील आठही मतदारसंघाचा तिढा सुटला आहे. ज्यात काँग्रेसला 3 मतदारसंघ, ठाकरे गटाला 4 मतदारसंघ, शरद पवार गटाला 1 मतदारसंघ मिळाला आहे.
Maha Vikas Aghadi Seat Sharing : महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा (Maha Vikas Aghadi Seat Sharing) तिढा अखेर सुटला असून, अंतिम फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. महाविकास आघाडीमधील पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाणार आहे?, याची माहिती दिली आहे. ज्यात मराठवाड्यातील (Marathwada) आठही मतदारसंघाचा तिढा देखील सुटला आहे. ज्यात काँग्रेसला 3 मतदारसंघ, ठाकरे गटाला 4 मतदारसंघ, शरद पवार गटाला 1 मतदारसंघ मिळाला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency) ठाकरे गटाला सुटला आहे. जालना लोकसभा मतदारसंघ (Jalna Lok Sabha Constituency) काँग्रेसकडे असणार आहे. परभणी लोकसभा मतदारसंघ (Parbhani Lok Sabha Constituency) ठाकरे गटाकडे, नांदेड लोकसभा मतदारसंघ (Nanded Lok Sabha Constituency) काँग्रेसकडे, बीड लोकसभा मतदारसंघ (Beed Lok Sabha Constituency) शरद पवार गटाकडे, धाराशिव लोकसभा मतदारसंघ (Dharashiv Lok Sabha Constituency) ठाकरे गटाकडे, हिंगोली लोकसभा मतदारसंघ (Hingoli Lok Sabha Constituency) ठाकरे गटाकडे, लातूर लोकसभा मतदारसंघ (Latur Lok Sabha Constituency) काँग्रेसकडे असणार आहे.
कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार?
- मराठवाड्यातील अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर देखील करण्यात आले आहेत. ज्यात संभाजीनगर लोकसभेतून ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
- जालना लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असून, अजून तिथे कोणत्याही उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.
- परभणी लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून संजय जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
- नांदेड लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असून, येथून वसंतराव बळवंतराव चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
- बीड लोकसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडे असून, या मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
- धाराशिव लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे असून, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
- हिंगोली लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे असणार असून, येथून नागेश पाटील आष्टीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे आणि त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
- लातूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असून, येथून शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
एकमेव जालना जिल्ह्याचा उमेदवार जाहीर होण्याचे बाकी...
मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघापैकी सात मतदारसंघामधील महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. पण एकट्या जालना लोकसभा मतदारसंघामधील उमेदवार अजूनही निश्चित झालेला नाही. जालना लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असणार आहे. त्यामुळे काँग्रेसमधून कुणाला उमेदवारी जाहीर होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तर, महायुतीमधून भाजपने केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना सहाव्यांदा जालना लोकसभेतून रिंगणात उतरवले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
MP List of Marathwada : मराठवाड्यातील 2019 मधील खासदारांची यादी