हनुमान जन्मस्थळ वाद; अंजनेरीचे गावकरी आक्रमक, गोविंदानंद महाराजांना दिलं आव्हान
Hanuman Birth Place Controversy : कर्नाटकातील किष्किंधा नगरीत हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा कर्नाटकमधील मठाधिपतींनी केला आहे. त्यामुळे हनुमानाच्या जन्मस्थळारून नवा वाद सुरू झालाय.
Hanuman Birth Place Controversy : हनुमान जन्मस्थळाच्या वादावरून आता नाशिकमधील अंजनेरीतील गावकरी एकटवटले आहेत. अंजनेरीतील अंजनी माता मंदिरात गावकरी आणि साधूसंतांची नुकतीच एक बैठक संपन्न झालीय. अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचे सर्व पुरावे आमच्याकडे असून, वेळ पडल्यास न्यायालयीन लढाई देखील लढवण्याचा निर्णय या बैठकीत सर्वांनुमते घेण्यात आलाय. गोविंदानंद महाराज यांनी अंजनेरी किल्ल्यावर यावं आम्ही त्यांना सिद्ध करून दाखवू, असं आवाहन अंजेनेरीच्या गावकऱ्यांनी केलं आहे.
कर्नाटकातील किष्किंधा नगरीत हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा कर्नाटकमधील मठाधिपतींनी केला आहे. त्यामुळे हनुमानाच्या जन्मस्थळारून नवा वाद सुरू झालाय. परंतु, ही किष्किंदा नगरी नाशिकमधील अंजनेरी पर्वताच्या मागील बाजूस असल्याचा प्रतिदावा सोमेश्वरनंद सरस्वती महाराज यांनी केलाय आणि अंजनेरीतील गावकऱ्यांनी देखील सोमेश्वरनंद सरस्वती महाराजांच्या दाव्याला पाठिंबा दिलाय.
गोविंदानंद स्वामी सरस्वती हे हनुमानाचा रथ घेऊन नुकतेच त्रंबकेश्वर नगरीत दाखल झाले आहेत. परंतु, त्यांनी केलेल्या दाव्यामुळे नवे वादळ उठले आहे. हनुमानाचा जन्म नाशिकच्या अजनेंरी पर्वतावर नाही तर कर्नाटकातील किष्किंदा नगरीत झाल्याचा दावा गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी केलाय. मात्र हा दावा खोडून काढताना त्रंबकेश्वरचे सोमेश्वरानंद महाराज यांनी किष्किंदा नगरी नशिकमध्येच असल्याचा प्रतिदावा केलाय. त्यामुळे आपला दावा सिद्ध करण्यासाठी हनुमानाच्या जन्मस्थळाच्या दाव्याला बळकटी देण्यासाठी रामायण कालीन प्रसंगाच्या जागांचा नव्याने शोध सुरू झाला आहे.सोमेश्वरनंद सरवस्ती आणि त्यांच्या शिष्यांनी पुढाकार घेत अंजनेरी पर्वत आणि आजूबाजूचा परिसर पिंजून काढण्यास सुरवात केलीय.
सोमेश्वरानंद सरस्वतींचा दावा
किष्किंदा नगरी अजनेंरी पर्वताच्या मागील बाजूस म्हणजे नाशिकमधील त्रंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्याच्या हद्दीवर असून अंजनेरी पर्वताला लागूनच हा दुसरा पर्वत आहे. इथेच सुग्रीवाचे राज्य होते, याच पर्वताच्या पायथ्याशी हनुमान आणि राम लक्ष्मण यांची भेट झाली. त्यावेळी हनुमानाने राम लक्ष्मणाला खांद्यावर बसवून पर्वतावर घेऊन गेले होते. हे तेच ठिकाण असल्याचा दावा केला जातोय. पर्वताच्या पायथ्याशी राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाचे मंदिर आहे. या मंदिराच्या समोरच पंपा सरोवर असून या कुंडातील पाणी कितीही दुष्काळ असला तरीही आटत नाही. रामाने बाण मारून इथे पाणी काढले अशी आख्यायिका ही सांगितली जाते, असा दावा पिठाधिश्वर पंचायती आखाड्याचे सोमेश्वरानंद सरस्वती यांनी केलाय.
सोमेश्वरानंद सरस्वतींच्या दाव्याला स्थानिकांकडून बळकटी
लक्ष्मणाने शूर्पणखाचे नाक पंचवटी परिसरात कापले, सीतेचे हरणही पंचवटी मध्येच झाले. अंजनेरी पर्वताला लागूनच हा परिसर असल्याने सोमेश्वरानंद सरस्वती यांच्या दाव्याला बळकटी येत असल्ल्याचा स्थानिकांचा दावा आहे. सध्या या गावाला कुशेगाव म्हणून ओळखले जाते. मात्र पुरातन काळापासून येथील नागरिक या भागाला किष्किंदा नगरी म्हणूनच ओळकतात. एवढेच नाही तर शासन दप्तरी, जिल्हा नियोजन समितीवर ही परिसराची किष्किंदा नगरी अशीच नोंद आहे. या परिसराच्या विकासासाठी वन विभागाककडे अडीच एकर जागेची मागणी करण्यात आलीय. तिर्थस्थळाचे पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती सदस्य जिल्हा नियोजन समितीच्या गोरख बोडके यांनी दिलीय.
अजनेंरी हेच एक ठिकाण नाही तर याच पर्वतपासून काही किलोमीटर अंतरावर एका तळ्याच्या काठावर अतिप्राचीन राम लक्ष्मण आणि सीतेचे मंदिर आहे. हा परिसर शबरी धाम होते. याच ठिकाणी राम आणि शबरीची भेट झाली, अशी आख्यायिका सांगितली जाते. सध्या हा परिसर भिलमाळ म्हणून ओळखला जातो. सोमेश्वर नंद महाराज यांनी याही ठिकाणी भेट देऊन।ग्रामस्थांशी चर्चा केली.
हनुमानाच्या जन्माची देशात नऊ ठिकाणे?
हनुमानाचा जन्म झाल्याचे दावे सांगणारी देशभरात जवळपास 9 ठिकाणं आहेत. 31 तारखेला नाशिकमध्ये यांसदर्भात साधू महंतची बैठक होणार आहे. मात्र, हजारो वर्षांपूर्वीचे पुरावे कोण आणि कसे सादर करणार हा खरा प्रश्न आहे.