एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उमरग्यातील जप्त कॅशप्रकरणी सहकारमंत्र्यांचे दोन वेगवेगळे दावे
![उमरग्यातील जप्त कॅशप्रकरणी सहकारमंत्र्यांचे दोन वेगवेगळे दावे Lokmangal Groups Clarification To Election Commission उमरग्यातील जप्त कॅशप्रकरणी सहकारमंत्र्यांचे दोन वेगवेगळे दावे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/08075710/Subhash_Deshmukh.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
उस्मानाबाद : नगरपालिकेच्या भरारी पथकानं जप्त केलेल्या रकमेप्रकरणी सहकारमंत्री सुभाष देशमुख अडचणीत सापडले आहेत. माध्यमं आणि निवडणूक आयोगाला जप्त केलेल्या पैशांप्रकरणी त्यांनी वेगवेगळी स्पष्टीकरणं दिली आहेत.
उमरग्यामध्ये देशमुख यांच्या लोकमंगल समुहाची 91 लाख 50 हजारांची रोकड उस्मानाबादच्या नगरपालिका भरारी पथकानं जप्त केली. ज्यामध्ये एक हजाराच्या जुन्या नोटा होत्या. मात्र ही ऊसतोडणी कामगाराच्या टोळीला देण्यासाठी होती, असा दावा सुभाष देशमुख यांनी केला.
त्यानंतर निवडणूक आयोगाला दिलेल्या स्पष्टीकरणात मात्र ही रक्कम लोकमंगल मल्टिस्टेट बँकेची असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे या रकमेमागचं गौडबंगाल तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
निवडणूक आयोग आता लोकमंगल मल्टिस्टेट बँकेच्या उमरगा शाखेची चौकशी करण्याच्या तयारीत आहे. चोविस तासांच्या आत उद्योग समूहाने हा नवा खुलासा दिला आहे.
'लोकमंगल'च्या जीपमधील पकडलेली रक्कम ऊसाच्या टोळीच्या पेमेंटची होती, असं लोकमंगल उद्योग समूहाचे प्रमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं होतं.
सुमारे एक कोटीची रोकड जप्त
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल समूहाची जवळपास एक कोटीची रक्कम नगरपालिका भरारी पथकानं जप्त केली होती. उस्मानाबादच्या उमरगा इथं ही कारवाई केली. नगर पालिका गस्ती पथकानं 91 लाख 50 हजार रुपयांची रक्कम पकडली.
टाटा सुमो जीपमधून ही रोकड जप्त केली. जुन्या एक हजार नोटांच्या रूपात ही रक्कम होती. जीपवर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल उद्योग समूहाचं नाव होतं. ही रक्कम लोकमंगल बँकेची असल्याची प्राथमिक माहिती होती.
याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. सहकारमंत्र्यांच्या उद्योगसमूहाच्या गाडीतल्या 91 लाखांविषयी कोणतीही कागदपत्रं नव्हती.
संबंधित बातम्या :
पकडलेल्या नोटांबाबत सहकारमंत्री म्हणतात..
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
बुलढाणा
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)