Lock Down | सांगलीत विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई, 4 तासात तब्बल 300 गाड्या जप्त
संचारबंदी असूनही काही जण सांगली शहरात फिरत आहेत. त्यांच्याविरोधात पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. चार तासात पोलिसांनी 300 वाहनं जप्त केली आहेत.
सांगली : सांगली शहरातील रस्त्यांवर विनाकारण दुचाकी घेऊन फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. विनाकारण दुचारी घेऊन बाहेर पडणाऱ्यांच्या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहे. अवघ्या चार तासात तब्बल 300 गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सांगलीकरांना घरपोच सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे किराणा माल आणि भाजीपाला खरेदीसाठी विनाकारण दुचाकी घेऊन बाहेर पडणाऱ्यांच्या गाड्या जप्त केल्या जातील असा इशारा सांगली शहर पोलीस उपअधीक्षक अशोक विरकर यांनी दिला होता. तरीही भाजीपाला, किराणा, औषध अशी कारणं सांगून दुचाकी घेऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही.
या इशाऱ्यानंतरही काही महाभाग विनाकारण वाहनं घेऊन घराबाहेर पडल्याने पोलिसांनी आज (31 मार्च) सकाळी सात वाजल्यापासून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. संचारबंदी असूनही काही जण शहरात फिरत असल्याचं पाहून पोलिसांनी प्रत्येक चौकात गाडी अडवून कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांनी चार तासात तब्बल 400 गाड्या जप्त केल्या आहेत.
मुंबई-पुण्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित सांगलीत आहे. सांगलीत 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. इस्लामपूरमधील कोरोनाबाधित कुटुंबीयांच्या संपर्कात शहरातील 337 नागरिक आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी इस्लामपूरमध्ये 29 मार्च ते 31 मार्चपर्यंत पूर्णत: लॉकडाऊन करण्याचा निर्णय नगरपालिकेच्या बैठकीत घेण्यात आला. या कालावधीत मेडिकल दुकानं दिवसाआड सुरु आहे. तर दूध, भाजीपाला, किराणा दुकानही बंद आहे. नागरिकांना अत्यावश्यक वस्तू घरपोच दिले जातील, असं सांगून लोक घराबाहेर पडत आहेत.
Coronavirus | सांगलीत बाहेर फिरणाऱ्यांच्या गाड्या जप्त करण्यास सुरुवात