एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हत्येविरोधात आंदोलन करणाऱ्या नागपूरकरांवर पोलिसांचा लाठीमार
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील जरीपटका पोलिस ठाण्यासमोर रास्ता रोको करणाऱ्या जमावावर पोलिसांनी लाठीमार केला आहे. दारुविक्रेत्याने केलेल्या हत्येविरोधात नागरिकांनी पोलिस स्टेशनसमोर आंदोलन करत दगडफेक केली. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आहे.
समता नगर परिसरातील प्रशांत चमके या अवैध दारु विक्रेत्याने रविवारी रात्री इमरातलाल राणा आणि पुरणलाल राणा या दोन सख्ख्या भावांची हत्या केली. घरातील सांडपाण्यावरुन राणा आणि चमके यांच्यामध्ये वाद झाला. आधी चमकेच्या गुंडांनी इमरातलाल यांना मारहाण करुन जखमी केलं. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर गुंडांचा मोर्चा राणा यांच्या घराकडे वळला. घरातील महिलांवरही हात उचलण्यापर्यंत या गुंडांची मजल गेली. गुंडांना अडवण्यासाठी आलेल्या पुरणलाल यालाही भोकसून ठार केलं.
या हत्येविरोधात संतप्त जमावाने जरीपटका पोलिस ठाण्यासमोर रास्ता रोको केला, तसंच दगडफेकही करण्यात आली. मात्र अवैध व्यवसाय करणाऱ्याकडून सामान्य नागरिकांची हत्या झाल्याने नागपूरकर रस्त्यावर उतरले. त्यांना आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेमुळे नागपूरमधील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement