एक्स्प्लोर
सातारा सैनिक स्कूलच्या स्टेडियमला शहीद महाडिकांचं नाव
सातारा: शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पहिल्या स्मृतीदिनी पोगरवाडीवासियांनी त्यांना अनोखं वंदन केलं. सातारा सैनिक स्कूलमधील स्टेडियमला शहीद महाडिक यांचं नाव देण्यात आलं. कर्नल महाडिक यांच्या मित्रांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
यावेळी कर्नल महाडिक यांची आई आणि बहीण उपस्थित होत्या. मात्र संतोष महाडिक यांची वीरपत्नी स्वाती या मात्र उपस्थित राहू शकल्या नाहीत.
देखना है जोर कितना...शहीद महाडिकांची पत्नी 'इंडियन आर्मी'त !
स्वाती महाडिक या सुद्धा इंडियन आर्मीत दाखल झाल्या आहेत. सध्या त्यांचं प्रशिक्षण सुरु आहे. त्यामुळे पतीचं दु:ख बाजूला सारून खांद्यावर बंदूक घेतलेल्या वीरपत्नी स्वाती महाडिक या सोहळ्याला उपस्थित राहू शकल्या नाहीत.शहीद संतोष महाडिक यांचं शेवटचं व्हॉट्सअॅप स्टेटस
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडातील जंगलात 17 नोव्हेंबर 2015 रोजी दहशतवाद्यांशी दोन हात करताना कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आलं. दहशतवाद्यांशी लढताना कर्नल संतोष महाडिक जखमी झाले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.‘माझी मुलगी आणि मुलगा लष्करातच जातील’ वीरपत्नीचा निर्धार
38 वर्षांचे कर्नल संतोष महाडिक हे 41 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर होते. त्याआधी त्यांनी 21 पॅरा स्पेशल कमांडो युनिटमध्ये कार्यरत होते. जिगरबाज संतोष महाडिक यांनी गाजवलेल्या शौर्यासाठी त्यांना सेना मेडलनं गौरवण्यात आलं होतं.शहिदांच्या कुटुंबियांबाबत उदयनराजे म्हणतात….
शेवटचं व्हॉट्सअप स्टेटस देशरक्षणासाठी वाहून घेतलेल्या संतोष महाडिक यांची कुटुंब आणि पत्नीबद्दलही तितकीच आपुलकी होती. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी व्हॉट्सअॅपवर अपडेट केलेलं स्टेटस याची जाणीव करून देतं. संतोष यांचं शेवटचं व्हॉट्सअॅप स्टेटस होतं, “12 वर्षांची साथ. या आनंदी सोबतीसाठी थँक यू डिअर” ( ‘12 years of blesful (blissful) togetherness. Thank you dear for being with me’.) संबंधित बातम्यादेखना है जोर कितना...शहीद महाडिकांची पत्नी 'इंडियन आर्मी'त !
शहीद संतोष महाडिक यांचं शेवटचं व्हॉट्सअॅप स्टेटस
शहीद संतोष महाडिक अनंतात विलीन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement