Lata Mangeshkar : लतादीदींच्या निधनाने राजकीय क्षेत्रातही शोककळा, नेत्यांकडून दीदींना आदरांजली
Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रातही शोककळा पसरली आहे. अनेक मोठ्या नेत्यांकडून लतादीदींना श्रद्धांजली वाहिली जातेय.
Lata Mangeshkar Passes Away : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. लतादीदींच्या निधनाने राजकीय क्षेत्रातूनही शोक व्यक्त केला जात आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लतादीदींच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. लता मंगेशकर यांचा सुमधुर आवाज अजरामर आहे. त्यांचा आवाज चाहत्यांच्या हृदयात कायम राहील, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तर, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनीदेखील लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
An era has ended.
— Congress (@INCIndia) February 6, 2022
Lata didi's soul-touching voice, songs of patriotism and her struggle-filled life will always be an inspiration for generations.
Salutations and heartfelt tributes on her final journey.
- Congress President, Smt. Sonia Gandhi's condolence message pic.twitter.com/p6M29MzAEC
"लता मंगेशकर यांच्या निधनाने आज एक युग संपले. लताजी या पिढ्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहतील." अशा शब्दांत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (president of inadian National Congress Soina Gandhi) यांनी आदरांजली वाहिली आहे."
Former Prime Minister, Dr. Manmohan Singh expresses his deepest sorrow on the passing away of Lata Mangeshkar ji. pic.twitter.com/4Hlgi1eH3V
— Congress (@INCIndia) February 6, 2022
तर, माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग (former prime minister of india Dr. Manmohan Singh) यांनी, "लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल मला अतिशय दु:ख झाले आहे. भारताने एक महान मुलगी गमावली आहे. त्या "भारताच्या नाइटिंगेल" होत्या. त्यांच्या गाण्यांद्वारे देशाच्या सांस्कृतिक एकात्मतेत मोठे योगदान आहे. त्यांचे निधन हे आपल्या देशाचे अपरिमित नुकसान आहे आणि ही पोकळी भरून काढणे अशक्य होणार आहे." "मी आणि माझी पत्नी लताजींच्या कुटुंबातील सदस्यांप्रती हार्दिक संवेदना पाठवतो आणि दिवंगत आत्म्याला शांती लाभो यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो." अशा शब्दांत आदरांजली वाहिली आहे.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून दुखवटा जाहीर केला आहे. राज्य सरकारने सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.