एक्स्प्लोर

Rajiv Satav Funeral : राजीव सातव अनंतात विलीन; कळमनुरीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

राजीव सातव यांच्यावर हिंगोलीतील कळमनुरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी त्यांचा मुलगा पुष्कराज याने मुखाग्नी दिला.

हिंगोली : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं रविवारी निधन झालं. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी पुण्यातील रुग्णालयात उपचारांदरम्यान अखेरचा श्वास घेतला. राजीव सातव यांच्या निधनातं वृत्त कळतात राज्य आणि देशाच्या राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात आली. सोमवारी त्यांच्यावर हिंगोलीतील कळमनुरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबतच इतरही मोठ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची हजेरी कळमनुरी येथे पाहायला मिळाली. 

मुलगा पुष्कराज यांने दिला मुखाग्नी
राजीव सातव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी त्यांचा मुलगा पुष्कराज याने मुखाग्नी दिला. यावेळी अंत्यसंस्कारांपूर्वी कळमनुरी येथे उपस्थित नेतेमंडळींनी सातव यांना आदरांजली वाहिली. अंत्यसंस्कारांसाठीच्या चौथऱ्यावर त्यांचं पार्थिव ठेवण्यासाठी नेण्यात आलं तेव्हा कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. 
राजकारणातील अभ्यासू आणि सुसंस्कृत व्यक्ती, अशी त्यांची ओळख होती.

दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर हिंगोली सारख्या एका छोट्याश्या जिल्ह्यातून पंचायत समिती सदस्य ते थेट खासदार अशी अत्यंत कमी वयात राजीव सातव यांनी मजल मारली. उच्चशिक्षित, अभ्यासू आणि आक्रमक बाणा असलेले राजीव सातव यांनी काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मोठं योगदान दिलं. उच्च विचारसरणी आणि साधी राहणीमान या धोरणाने काँग्रेस पक्षात त्यांनी आपलं मोठं वजन निर्माण केले होतं. पक्षातही युवक काँग्रेसचे सरचिटणीस, प्रदेश अध्यक्ष ते युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष अशी पद त्यांनी भूषवली. शिवाय सध्या ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निमंत्रित सदस्यही होते.

राजीव सातव यांची राजकीय कारकिर्द 

2002 साली  ते हिंगोलीच्या कळमनुरी पंचायत समिती सदस्यपदी निवडून गेले. 
2007 साली ते हिंगोली जिल्हा परिषद सदस्य झाले आणि त्यांची कृषी व पशुसंवर्धन सभापती पदी नियुक्ती झाली. 
2008 साली ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले. 
2009 साली ते कळमनुरी विधानसभेतुन पहिल्यांदा आमदार झाले.
2010 साली त्यांची अखिल भारतीय युवक काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाली. 
2014 साली ते हिंगोली लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आणि 16 व्या लोकसभेचे सदस्य झाले.  
मार्च 2018 साली राजीव सातव अखिल भारतीय काँग्रेसचे ते गुजरात प्रभारी झाले. 
मार्च 2020 साली त्यांची महाराष्ट्रातून राज्यसभेवर नियुक्त झाली. 

राजीव सातव यांच्या अकाली मृत्यूमुळे काँग्रेस पक्षाचे न भरून येणारे नुकसान झालं आहे. त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Naxalism : नक्षलबारी ते गडचिरोली, भारतातील नक्षलवादाचा इतिहास काय? बंदुकीच्या आवाज थांबतोय, विकासाकडे पाऊल पडणार का?
नक्षलबारी ते गडचिरोली, भारतातील नक्षलवादाचा इतिहास काय? बंदुकीच्या आवाज थांबतोय, विकासाकडे पाऊल पडणार का?
MSRTC : ऐन दिवाळीत एसटी आरक्षण प्रणाली ठप्प, नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास, कर्मचारीही वैतागले
ऐन दिवाळीत एसटी आरक्षण प्रणाली ठप्प, नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास, कर्मचारीही वैतागले
आशिया कपमध्ये भारताविरुद्ध सलग तीन पराभव सलमान आगाला महागात पडणार, पाकिस्तान नवा कॅप्टन निवडणार, या खेळाडूच्या नावाची चर्चा
आशिया कपमध्ये भारताविरुद्ध तीनवेळा पराभव, सलमान आगाचं कर्णधारपद जाणार?पाकिस्तानला नवा कॅप्टन मिळणार
Gujarat Cabinet Reshuffle : नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरिय बैठक अन् गुजरातच्या 16 मंत्र्यांचे राजीनामे, भाजपनं फेरबदल का केले?
मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरिय बैठक अन् गुजरातमध्ये भाजपनं भाकरी फिरवली, पटेलांना मंत्र्यांची नवी टीम मिळणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ram Mandir Station Delivery :: 'बाळाचं डोकं बाहेर आलं होतं', धावत्या ट्रेनमध्ये महिलेची प्रसूती
Bulldozer Action: Satpur गोळीबार प्रकरणातील आरोपी, RPI जिल्हाध्यक्ष Prakash Londhe यांच्या Nashik मधील अनधिकृत बांधकामावर बुलडोझर!
Thane Politics: 'अभी नहीं तो कभी नहीं', ठाण्यात BJP चा स्वबळाचा नारा; शिंदेंसमोर मोठा पेच!
MVA Politics: 'मनसे MVA चा घटक दल आहे का?', शिंदे गटाचे Sanjay Nirupam यांचा थेट सवाल
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात 1 लाखांवर बोगस मतदार, सत्ताधारी आमदाराचा घरचा आहेर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Naxalism : नक्षलबारी ते गडचिरोली, भारतातील नक्षलवादाचा इतिहास काय? बंदुकीच्या आवाज थांबतोय, विकासाकडे पाऊल पडणार का?
नक्षलबारी ते गडचिरोली, भारतातील नक्षलवादाचा इतिहास काय? बंदुकीच्या आवाज थांबतोय, विकासाकडे पाऊल पडणार का?
MSRTC : ऐन दिवाळीत एसटी आरक्षण प्रणाली ठप्प, नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास, कर्मचारीही वैतागले
ऐन दिवाळीत एसटी आरक्षण प्रणाली ठप्प, नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास, कर्मचारीही वैतागले
आशिया कपमध्ये भारताविरुद्ध सलग तीन पराभव सलमान आगाला महागात पडणार, पाकिस्तान नवा कॅप्टन निवडणार, या खेळाडूच्या नावाची चर्चा
आशिया कपमध्ये भारताविरुद्ध तीनवेळा पराभव, सलमान आगाचं कर्णधारपद जाणार?पाकिस्तानला नवा कॅप्टन मिळणार
Gujarat Cabinet Reshuffle : नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरिय बैठक अन् गुजरातच्या 16 मंत्र्यांचे राजीनामे, भाजपनं फेरबदल का केले?
मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरिय बैठक अन् गुजरातमध्ये भाजपनं भाकरी फिरवली, पटेलांना मंत्र्यांची नवी टीम मिळणार
Share Market : शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, दिवाळीपूर्वी गुंतवणूकदार मालामाल, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजीची कारणं...
शेअर बाजाराला 'या' तीन कारणांमुळं झळाळी, सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल
Gujarat Cabinet: गुजरात सरकारमध्ये राजकीय भूकंप! मुख्यमंत्री सोडून सर्वच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा; अमित शाह सुद्धा आज रात्रीच होम ग्राऊंडवर पोहोचणार
गुजरात सरकारमध्ये राजकीय भूकंप! मुख्यमंत्री सोडून सर्वच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा; अमित शाह सुद्धा आज रात्रीच होम ग्राऊंडवर पोहोचणार
अवघ्या 10 महिन्यांपूर्वी लग्नाच्या बेडीत, त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टर पत्नी म्हणाली, पोटात दुखतंय; गॅस्ट्रो-सर्जन डॉक्टर पतीनं तिथंच संधी शोधली अन्... तब्बल सहा महिन्यांनी हत्येचा कट उघडकीस
अवघ्या 10 महिन्यांपूर्वी लग्नाच्या बेडीत, त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टर पत्नी म्हणाली, पोटात दुखतंय; गॅस्ट्रो-सर्जन डॉक्टर पतीनं तिथंच संधी शोधली अन्... तब्बल सहा महिन्यांनी हत्येचा कट उघडकीस
Gold Rate Prediction: सोन्याच्या दरात लवकरच मोठी घसरण होणार? ठेवावे की विकावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
सोन्याच्या दरात लवकरच मोठी घसरण होणार? ठेवावे की विकावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
Embed widget