Rain Update : आंबेनळी घाटात दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत
Rain Update : रात्री आंबेनळी घाटात दरड कोसळली आहे.
Rain Update : रात्री आंबेनळी घाटात दरड कोसळली आहे. कोसळलेल्या दरडीमुळे रस्त्याचा एक भाग दरीत गेला आहे. या दरडीमुळे दोन्ही बाजूला वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर, दरडी काढण्याचे काम सुरू आहे. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.
आंबेनळी घाट हा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर पासून ते सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या मार्गावर आहे. हा राज्य महामार्ग क्र.72 असून एकूण 40 कि.मी. लांबीचा गाडीरस्ता आहे. घाटाची उंची सर्वसाधारणपणे 625 मी (2051 फूट) आहे.
महाबळेश्वर ते पोलादपूरमध्ये दोन घाट आहेत ‘फिट्झेराल्ड’ हा महाबळेश्वर ते वाडा कुंभरोशीपर्यंत आहे. तर, दुसरा ‘आंबेनळी’ हा कुंभरोशी ते पोलादपूरपर्यंत आहे. जावळीच्या घनदाट अरण्यात हा घाट येतो.
धोकादायक वळणामुळे अपघाताचे वाढते प्रमाण
कोकणातील आणि महाबळेश्वरातील पर्यटन वाढल्यामुळे या घाटात आता गाड्यांची वर्दळ देखील बरीच वाढलेली आहे. या घाटातील रस्ता धोकादायक वळणाचा असल्याने अपघाताचे प्रमाणही बरेच वाढलेले आहे. या घाटात काही वर्षांपूर्वी कोकण कृषि विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या बसचा अपघात झाला होता. त्या दरम्यान एक वगळता सर्वांचा दरीत कोसळून मृत्यू झालेला.
आंबेनळी घाटात दोन दिवसांपासून दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे या घाटातील वाहतुकीबाबत मोठा निर्णय घेतल्या जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :