एक्स्प्लोर
रत्नागिरीत डोंगर, जमीन खचण्याचे सत्र सुरुच, अनेक घरांना धोका
डोंगरांना तडे कशामुळे जात आहेत? का होतंय? याचं कारण काय? याबाबत काहीही माहिती अहवाल प्रशासनाने अद्याप सादर केलेला नाही. काही ठिकाणची पाहणी केली काहींना स्थलांतराच्या नोटीसा सुद्धा देण्यात आल्या. मात्र अस का घडतंय याच कारण अजूनही प्रशासनाला मिळाले नाही.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात डोंगर, जमीन खचण्याचे सत्र सुरुच आहे. यंदाच्या पावसात जिल्ह्यातील अनेक भागात डोंगर खचण्याचे प्रमाण ठिकठिकाणी वाढत गेले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कुठे कुठे डोंगर खचला आणि जमीन खचली यावर एक नजर टाकूया.
- जिल्ह्यात सुरुवातीला चिपळूणमधील चिवेली येथील डोंगर खचला. त्यामुळे माती आणि दरड महामार्गावर आल्याने महामार्ग काही काळ बंद होता.
- तिवरे येथील धरणाच्या बाजुची जागा धरणग्रस्तांच्या निवारा शेड बांधण्यासाठी जी जागा प्रशासनाने निश्चित केली त्या डोंगराचा काही भाग खचला.
- संगमेश्वर येथील निवे बुद्रूक जोशीवाडी धरणाच्या बाजूचा डोंगर खचला गेला.
- रत्नागिरी मिरजोळे येथील जमीन मोठ्याप्रमाणावर खचली असून शेतजिनीचे मोठ्याप्रामाणावर नुकसान झाले.
- संगमेश्वर फुणगुस थुळवाडी येथील जमिनीला मोठ्याप्रमाणावर भेगा पडल्या असून वस्तीतील काही घरांना तडे गेल्याने वाडीतील 22 घरांना धोका निर्माण झाला असून अजूनही लोकान्मध्ये भितीचे वातावरण..
- खेड तालुक्यातील दहिवली गावातील जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्याने तेथील घरांना धोका निर्माण झाला.
- एकाच दिवशी चिपळूण तालुक्यातील दोन घटना घडल्या. नांदीवसे आणि कोळकेवाडीतील लांबेवाडी येथील डोंगराला तडे जाऊन तेथील तो खचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
- रत्नागिरीतील शिळ येथील धरणाच्या सांडव्याच्या बाजूचा डोंगराचा भाग खचल्याने कालव्याच्या बाजूला सरकला आणि संरक्षक भिंतही कोसळून धरणाच्या डाव्या बाजूला भेगा पडल्या.
- राजापूर तालुक्यातील ओनी तिसेवाडी येथील संपूर्ण डोंगराला तडे गेले असून मोठमोठ्या भेगा पडल्या. भातशेती तसेच घरांमध्ये फुटांपर्यंत भेगा पडल्या.
- रत्नागिरीमध्ये कोळंबे येथील डोंगराळ जमिनीला भेगा पडल्याने तेथील वाडीला धोका निर्माण झाला.
- साखरपा पुर्ये धनगरवाडी जवळचा डोंगर खचल्याने परिसरातील घरांना धोका निर्माण झाला.
- चिपळूण तालुक्यातील कळंबट येथे भेगा पडल्याने तेथील जमिनीचा भाग मोठ्याप्रमाणावर खचला. तेथील घरांना धोका निर्माण झाला.
- रत्नागिरीतील भडवळे देऊळवाडी ते शिंदेवाडी जमिनीला मोठ्याप्रमाणावर तडे गेले असून दोन्ही वाड्यांना धोका निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात अशाप्रकारे जमीन खचण्याचे आणि डोंगराला तडे जाण्याचे सत्र सुरुच आहे. हे कशामुळे होतंय? का होतंय? याचं कारण काय? याबाबत काहीही माहिती अहवाल प्रशासनाने अद्याप सादर केलेला नाही. काही ठिकाणची पाहणी केली काहींना स्थलांतराच्या नोटीसा सुद्धा देण्यात आल्या. मात्र अस का घडतंय याच कारण अजूनही प्रशासनाला मिळाले नाही.
सिंधुदुर्गमध्ये डोंगर खचल्याने अनेक गावांना धोका
तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगर खचल्याने अनेक गावांना धोका निर्माण झाला आहे. सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे, असनिये गाव, दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे, सासोली, कुडासे येथे डोंगर खचले आहेत. याशिवाय वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावात डोंगर खचले असून कुडाळ तालुक्यातील आकेरी घाट, नेरुर वाघोटनेवाडी इथेही डोंगराला तडे जाण्याच्या घटना घडल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement