अजितदादा जे बोलतात ते करतात, लाडकी बहिण योजनेबाबत खासदार सुनेत्रा पवार यांचं मोठं वक्तव्य
लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Sunetra Pawar on Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला महिलांना 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. या योजनेवरुन सरकारवर वारंवार टीका होत आहे, याबाबत सुनेत्रा पवार यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, यासाठी पैशांची तरतूद केली आहे म्हणूनच लाडकी बहिण योजना सुरु आहे असे त्या म्हणाल्या. याबाबत अजितदादा योग्य पद्धतीने उत्तर देतील. अजितदादा जे बोलतात ते करतात. त्यामुळं लाडकी बहिण ही योजना बंद होण्याचा प्रश्नच नसल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
गुन्हेगारांच्या मागे कधीही पक्ष उभा राहणार नाही
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर देखील सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वैष्णवी हगवणे सारख्या घटना दुर्दैवी आहेत. या घटना महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाहीत. यातील गुन्हेगारांच्या मागे कधीही पक्ष उभा राहणार नसल्याचे खासदार सुनेत्रा पवार यांनी सांगितले. मात्र सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबाबत पक्षाध्यक्ष बोलले आहेत असे सांगून पवार यांनी या विषयावर बोलणे टाळले. आज वाखरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यासाठी खासदार सुनेत्रा पवार आल्या होत्या.
कुटुंब आणि पक्ष हे वेगळे आहेत
वारंवार चाकणकर यांच्याबाबत विचारुनही सुनेत्रा पवार यांनी यावर पक्षाध्यक्ष बोललेत एवढेच उत्तर दिले. दोन पवार एकत्र येण्याच्या चर्चांवर बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, या सर्व फक्त चर्चा आहेत. ज्यावेळी होईल तेव्हा तुम्ही बघालच असे सांगत पक्ष घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी राहणार असल्याचे सुनेत्र पवार यांनी सांगितले. कुटुंब आणि पक्ष हे वेगळे आहेत हे मी पूर्वीपासून सांगत आलेले आहे असे पवार म्हगणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस महिलांच्या वतीनं आज पंढरपूरमध्ये महिला मेळाव्याचं आयोजने केलं होते. या महिला मेळाव्याच्या निमित्ताने मार्गदर्शन करण्यासाठी सुनेत्रा पवार पंढरपुरात आल्या होत्या. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विविध विषयांवर भाष्य केलं. लाडकी बहिण योजना बंद होणार नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले. तसेच अजितदादा जे बोलतात ते करतात असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या:


















