लाडकी बहीण योजनेला मराठवाड्यात मोठा प्रतिसाद, महिलांना मिळणार 731 कोटी 85 लाख रुपये, किती महिलांनी केले अर्ज?
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेला (Ladki Bahin Yojana) राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विशेषत: मराठवाड्यातून (Marathwada) या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
Ladki Bahin Yojana : महायुती सरकारनं (Mahayuti Govt) जाहीर केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेला (Ladki Bahin Yojana) राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विशेषत: मराठवाड्यातून (Marathwada) या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, आतापर्यंत 26 लाख 24 हजार 461 महिलांनी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी 1 लाख 84 हजार 957 अर्ज नाकारण्यात आले आहेत. तर 24 लाख 39 हजार 504 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. मराठवाड्यातील महिलांना योजनेच्या पहिल्या दोन हप्त्यांपोटी सरकार 731 कोटी 85 लाख 12 हजार रुपये देणार आहेत.
कोणत्या जिल्ह्यातून किती अर्ज?
छत्रपती संभाजीनगर
मंजूर अर्ज 5,26,511
97.22 टक्के
जालना
मंजूर अर्ज 2,70,439
99 टक्के
बीड
मंजूर अर्ज 3,37,196
95.61 टक्के
परभणी
मंजूर अर्ज 2,20,491
85.72 टक्के
नांदेड
मंजूर अर्ज 4,22,915
89.38 टक्के
हिंगोली
मंजूर अर्ज 1.73,988
97.14 टक्के
लातूर
मंजूर अर्ज 3,16,563
93.02 टक्के
धाराशिव
मंजूर अर्ज 58643
95.31 टक्के
अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेतंर्गत अटी-शर्थींसह योजनेच्या सर्व तरतुदींमध्ये बसणाऱ्या सर्व महिलांना प्रतिमहिना 1 हजार 500 रुपये दिले जाणार आहेत. ही योजना जाहीर केल्यानंतर योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्व ठिकाणी महिलांची झुंबड उडाल्याचे चित्र आहे. या योजनेला राज्याच्या सर्वच जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
अर्ज भरण्यासाठी कधीपर्यंत मुदत?
'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेसाठी दिलेल्या मुदतीपर्यंत 21 ते 65 वर्ष वयोगटातील सर्व पात्र महिला अर्ज करू शकतात. राज्य शासनानं या योजनेंतर्गत अर्ज करण्याची मुदत 15 जुलैपर्यंतची ठेवली होती. या मर्यादेत शासनाने सुधारणा केली असून आता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1 हजार 500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
लाडकी बहिण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
दरम्यान, लाडकी बहिण योजनेचा अर्ज करण्यासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, फोटो ही कागदपत्रे आवश्यक आहेत. योजनेचे अर्ज पोर्टल / मोबाइल अँप / सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. नारीशक्ती अॅपवरही अर्ज भरता येईल. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.
महत्वाच्या बातम्या: